Published On : Fri, Aug 31st, 2018

येत्या काळात सर्वच प्रश्नावर सरकारला घेरणार- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Advertisement

मुंबई : राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे… महागाईचा प्रश्न आहे… खड्ड्यांचा प्रश्न आहे… त्यामुळे येत्या काळात या सर्वच प्रश्नांवरून सरकारला घेरण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी धुळे येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.

याशिवाय या पत्रकार परिषदेमध्ये येत्या काळात संपूर्ण राज्याचा दौरा करून पक्ष संघटना आणखी मजबूत करणार असल्याचेही स्पष्ट केले.पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारताच्या जवळच्या सर्व राष्ट्रांत पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी याबाबत उत्तर द्यावे. तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतही पेट्रोल डिझेलचे दर सर्वात जास्त आहे याबाबतचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा असे आवाहन करतानाच खरं रुपयाचे अवमुल्यन झाल्याने देशाची आर्थिक घडी बिघडली आहे. त्यामुळे सरकारला देश चालवता येत नाही असा आरोपही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.

भाजपने दिल्लीत पक्षाच्या कार्यालयाची इमारत भव्य दिव्य बांधली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपला स्वच्छ चारित्र्याचा पक्ष म्हणून ओळख होती पण आता ती ओळख पुसली गेली आहे. काही गोष्टींचा अतिरेक होत आहे. अतिरेक जास्त काळ टिकत नाही आपण हे महाभारतापासून बघत आलोय. इंदिरा गांधी यांनीही आणीबाणी लावली आणि इंदिरा सरकारचा पराभव झाला होता. आताही कोणी अतिरेक करत असेल तर त्यांचाही अंत झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

देशातील सर्वच राजकीय पक्षांची मागणी आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात. निवडणूक आयोगाने एकदा बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात. एकदाच दुध का दुध… पाणी का पाणी होवू द्या असे सांगतानाच बॅलेट पेपरला फक्त भाजपचा विरोध आहे यावरुन सिद्ध होते की, भाजप निवडणूक आयोग आणि इतर स्वतंत्र यंत्रणांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणणं चुकीचं ठरणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

परिवर्तनवादी विचारांच्या कार्यकर्त्यांना देशभरातून अटक केली जात आहे. हत्येच्या कटाच्या गप्पा कोणी मेलवर करणार आहे का ? एका विशिष्ट संस्थेचे धागेदोरे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येत सापडत आहेत. या मुद्द्याला बगल देण्यासाठी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. देशात कोणीही अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत असेल त्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.

मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या मंत्र्यांच्या चौकशा झाल्या मात्र ते अहवाल सरकारने सादर केलेले नाहीत. एकनाथ खडसे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ करण्यात आले त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले पण इतर मंत्र्यांचे भ्रष्टाचार त्यापेक्षा मोठे आहेत पण त्यावर सरकार काहीच बोलत असेही शेवटी जयंत पाटील म्हणाले.

Advertisement
Advertisement