Published On : Sat, Jan 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

जेई लस म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल !

Advertisement

डॉ. मंगेश गुलवाडे : जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृती पालकसभा


चंद्रपूर : जपानीज एन्सेफलिटीस आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरण म्हणजे पुढच्या पिढीसाठी कवच कुंडल होय. पालकांनी मनात कोणतीही शंका तीन जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत १ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांचे लसीकरण करू घ्यावे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.

जॅपनीज एन्सेफलाइटिस प्रतिबंधात्मक लसीच्या जनजागृतीसाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त वतीने
शहरातील शाळांमध्ये पालकसभा घेण्यात आली. एमबी मॉडेल स्कुल कृष्णनगर व भगिनी निवेदिता स्कुल कृष्णनगर येथे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जय लेहरी स्कुल संजयनगर येथे डॉ. प्रीती चौहान, अमरवीर भगतसिंग स्कुल इंदिरानगर आणि ट्रिनिटी कॉन्व्हेंट इंदिरानगर येथे डॉ. पियुष यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, डॉ. अनुप पालीवाल यांनी जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण यासंदर्भात माहिती दिली.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या लसीकरण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहरात पहिल्या आठवड्यात शाळेत, अंगणवाडी, मदरशामध्ये जाणाऱ्या मुलांचे लसीकरण, पुढील दोन आठवड्यात शाळेत न जाणाऱ्या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. ही लस मोफत असून, खासगी रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे मनात शंका न ठेवता लस घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Advertisement
Advertisement