कामठी: ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या खाकी वर्दीतील पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची मुख्य जवाबदारी असते मात्र यातील काही भ्रष्ट पोलिसांमुळे या ब्रीद वाक्याला गालबोट लागण्याचा प्रकार कित्येक ठिकाणी घडत आहे ज्याची प्रणिती कामठी तालुक्यातील कढोली च्या बिट मार्शल च्या आशीर्वादाने कढोली गावात सुरू असलेला अवैध दारूचा महापूर तसेच इतर अवैध व्यवसायातुन दिसत आहे.तर या बिट मार्शल च्या आशीर्वादाने गावात अवैध धंद्याचा सुळसुळाट पसरला आहे.
कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या कढोली गाव हे तंटामुक्त गाव असून विकासाच्या दृष्टिकोनातुन एक आदर्श गाव म्हणून निर्माण झाले आहे मात्र मागील काही महिन्यापासून कढोली गावातील जवळपास पाच ते सहा घरी बिनधास्त पणे अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे तसेच सट्टा व्यवसाय सुद्धा सुरू आहे ज्यामुळे गावातील कित्येकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत तर तरुणाई या व्यसनाकडे वळत असून तरुणाई नैराशेच्या खाईत झोकल्या जात आहे तर या गावातील बिट जमादाराच्या आशीर्वादाने या गावात पोलिसांचे कुठलेही भय राहले नसून पोलिसांना देत असलेल्या चिरीमिरी मुळे गावात अवैध व्यवसायाला उधाण आले आहे तसेच गावात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे आदर्श गावाला गालबोट लागत असून तंटामुक्त गावातच तंटे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आगामी निवडणुका लक्षात घेता गावात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने मौदा पोलीस विभागाच्या वरिष्ठ पोलीस पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून सुरू असलेल्या अवैध धंद्याला लगाम घालावे अशी मागणी कढोली गावातील जागरूक ग्रामस्थानि केली आहे.
यासंदर्भात कढोली ग्रामपंचायत चे सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी शिष्टमंडळासह पोलीस विभागाला कित्येकदा निवेदन केले मात्र पोलीस विभाग याकडे अक्षम्य दुर्लक्ष पुरवीत असल्याचे सांगण्यात येते परिणामी गावातील अवैध व्यावसायिकांचे मनोबल वाढलेले आहे.
– संदीप कांबळे कामठी