Published On : Fri, Jan 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

परळीत मतदान केंद्रावर बटण दाबण्याचे काम ही गँग करायची;व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा दावा

Advertisement

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सत्तेत आल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. सत्ताधारी नेत्यांनी पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकण्यासाठी मतदान केंद्र ताब्यात घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केला आहे. बीडमधील वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारांना दिल्या जाणाऱ्या संरक्षणावरून आव्हाडांसह अनेक विरोधक थेट धनंजय मुंडेंवर आरोप करत असतानाच आता त्यांच्या निवडणूक विजयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गजाभाऊ नावाच्या एक्स हँडलवरून करण्यात आलेली पोस्ट आव्हाड यांनी रिपोस्ट केली आहे. तसेच आव्हाड यांनी लिहिले की, परळी मतदारसंघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे. मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटण दाबण्याचे काम ही गँग करायची.

सगळे एकदम ट्रान्सपरंट हे सगळे पोलिसांसमोरच घडत होतं, असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुख यांनी सांगितलं. मतदान केंद्राचे काही व्हिडीओ देखील आहेत. परंतु, याला कोण काय करणार, हे कायद्याचे राज्य आहे. पुढे कोणाला कंत्राट द्यायचे असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा, असा घणाघात आव्हाड यांनी केला.

Advertisement