– वंदना सवरंगपते नव्या उपविभागिय अधिकारी म्हणून रुजू
रामटेक – जोगेंद्र कट्यारे यांची सांगली येथे बदली झाल्याने वंदना सवरंगपते ह्या नुकत्याच रामटेक च्या उपविभागिय अधिकारी म्हणून रुजू झाल्या.त्यांनी नुकताच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. पूर्व उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी 3 वर्षे रामटेक येथे उत्तम कामगिरी बजावली त्याकरिता त्यांना तहसीलदार बाळासाहेब मस्के, प्रशांत सांगळे , बीडीओ प्रदीप बमनोटे ,प्रशासकिय अधिकारी , कर्मचारी , यांनी भावपूर्ण निरोप दिला.
वंदना सवरंगपते यांची .रिक्त झालेल्या पदावर उपविभागीय अधिकारी म्हणून राज्य शासनाने त्यांची नियुक्ती केली आहे.
तहसीलदार बाळासाहेब मस्के सह मत्स्य विभागाचे माजी अध्यक्ष अशोक बर्वे सह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या एस डी ओ वंदना सवरंगपते ह्या इथे कार्यभार सांभाळायचे आधी गोंदिया इथे 2 वर्ष उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
त्यांचेकडे रामटेक च्या गडमांदिर चे रिसिव्हर म्हणूनही जवाबदारी राहणार आहे.