नागपूर : आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) एजन्ट कडून खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकाराला सदर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
सुनील सुकलाल हजारी (४४) असे आरोपी पत्रकाराचे नाव असून ते एका नामी वृत्तपत्रात चीफ एडिटर म्हणून काम करतात.
डीसीपी राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, RTO मध्ये सुरू असलेल्या घडामोडीविरोधात न्यूज पेपर मध्ये वृत्त देण्याच्या बदल्यात हजारी यांनी आरटीओ एजंट आणि बाबा दीप सिंग नगर, नागपूर येथील रहिवासी धनराज उर्फ टिटू साधू राम शर्मा (५५) याला 10 लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.
तक्रारदाराने 28 ऑगस्ट 2024 रोजी हजारी यांना 1 लाख रुपये दिले. खंडणीचा दुसरा हफ्ता देण्याआधी शर्मा याने हजारी विरोधात तक्रार दाखल केली.सादर पोलिसांनी सापळा रचून हजारे यांना 80 हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक केली.
पोलिसांनी हजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आहे.