कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पापा च्या बगीच्या जवळील अवैध कत्तल खाण्यासमोर 7 गोवंश जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी अमानुषपणे निर्दयतेने बांधून ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी आज दुपारी साडे तीन दरम्यान सदर घटनास्थळी धाड घालून कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 7 ही गोवंश जनावरे ताब्यात घेऊन नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही करीत सदर जनावरे शेख फरीद शेख दादामिया यांच्या मालकीची असल्याची माहिती वरून पोलिसांनी सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा नोंदविला.
ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, गुन्हे पोलीस निरीक्षक देविदास कठाळे , पो हवा.किशोर मालोकर, तंगराजन पिल्ले, दिलीप ढगे, अलोक रावत, धर्मेंद्र राऊत, राजेश पाल, विवेक श्रीपाद, उमेश पडोळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे कामठी