नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी खुल्या न्यायालयात राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.
व्यासपीठावरून बाहेर पडण्यापूर्वी न्यायमूर्ती देव उपस्थित वकिलांना म्हणाले, ‘माझ्या कडकपणामुळे तुम्हाला त्रास झाला असेल आणि मी न्याय मिळवून देण्यासाठी पुरेसे काम केले नाही असे वाटत असेल, तर मला वाटते की मी राजीनामा द्यावा.
न्यायमूर्ती रोहित देव म्हणाले की, जे न्यायालयात हजर आहेत त्यांची प्रत्येकाची माफी मागतो. मी तुम्हांला खडसावले कारण तुम्ही सुधारावे अशी माझी इच्छा आहे. मला तुमच्यापैकी कोणालाही दुखवायचे नाही कारण तुम्ही सर्वजण माझ्यासाठी कुटुंबासारखे आहात मी माझा राजीनामा सादर केला आहे हे सांगताना मला वाईट वाटते. मी माझ्या स्वाभिमानाच्या विरोधात काम करू शकत नाही, असे देव म्हणाले.
देव यांच्या राजीनाम्याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. न्यायमूर्ती देव हे नेहमीच न्यायालयीन सुनावणीदरम्यान कठोर वागणुकीसाठी ओळखले जातात. न्यायमूर्ती देव यांनी अचानकपणे राजीनामा का दिला हे पाहावे लागेल.