भारत : महाराष्ट्रातील सर्वात आवडत्या चहा ब्रँडपैकी एक असलेल्या सोसायटी टी ने महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी त्यांचा नवीनतम जाहिरात चित्रपट – ‘कडक सुर्वे – चाय भारी’ सादर केला आहे. या जाहिरातीत लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख “कडक सुर्वे या धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकले आहेत जे कडकनेसचे प्रतीक आहे.
या जाहिरातपटाच्या माध्यमातून दमदार आणि ताकदवान डस्ट टीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे – असा चहा जो महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांना ऊर्जा देतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आलेला हा जाहिरातपट महाराष्ट्रातील चहा प्रेमींच्या कडक चहावरच्या प्रेमाची झलक दाखवतो. हे दाखवण्यासाठी सोसायटी टीने काहीतरी वेगळं, काहीतरी ‘भारी’करण्याचा निर्णय घेतला.
उच्च-ऊर्जेने भरलेली कथा, रंगतदार दृश्यं आणि रितेश देशमुखची जबरदस्त उपस्थिती यामुळे “कडक सुर्वे – चहा भारी” केवळ एक जाहिरात नाही, तर एक अनुभव आहे. हा जाहिरातपट कडक, स्वादिष्ट चहावरील प्रेम आणि त्यातून मिळणाऱ्या उर्जेला समर्पित आहे.
लॉन्चवेळी बोलताना सोसायटी टीचे संचालक करण शाह म्हणाले की, “कडक चहा केवळ एक भावना आहे. ‘कडक सुर्वे – चहा भारी’ द्वारे, आम्हाला आमच्या चहाच्या कपमधून मिळणारी ऊर्जा, ताजेपणा दाखवायचा होता. रितेश देशमुखच्या दमदार अभिनयामुळे ही संकल्पना जिवंत झाली आहे, ज्यामुळे ही मोहीम खरोखरच ‘भारी’ ठरली आहे!”
रितेश देशमुख ‘कडक सर्वे – चहा भारी’ च्या लॉन्चवेळी म्हणाले, “हा संकल्पना ऊर्जा आणि मजेशीर क्षणांनी भरलेली आहे आणि ती खरोखरच चहाच्या कडक स्पिरिटला साजेशी आहे. एक कडक पण मिश्कील पोलिस अधिकारी साकारताना खूप मजा आली, कारण यात अॅक्शन आणि ह्यूमरचा उत्तम संगम आहे, जो प्रत्येकाला आवडेल. आपले मुंबई पोलिस त्यांच्या निडर वृत्ती आणि स्मार्ट शैलीसाठी ओळखले जातात, आणि आम्ही तोच देसी वाइब या फिल्ममध्ये आणला आहे. जसं सोसायटी टीचा डस्ट टी कडक, वैशिष्ट्यपूर्ण आणि अगदी भारी आहे, तसाच हा कॅम्पेन देखील!”
ही जाहिरात आता मेटा आणि यूट्यूब या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाली आहे. सर्व चहा प्रेमींना सोसायटी टीच्या डस्ट टीच्या अतुलनीय ताकदीचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
सोसायटी टी विषयी: https://societytea.com/
सोसायटी टी हा भारतीय घरांमध्ये अनेक वर्षांपासून रुजलेला एक विश्वासू आणि दर्जेदार चहा ब्रँड आहे. सर्वोत्तम चहा देण्याच्या वचनबद्धतेसह स्थापन झालेल्या या ब्रँडने आपल्या उत्कृष्ट चहा श्रेणींनी कोट्यवधी लोकांची मने जिंकली आहेत. भारतात चहा संस्कृतीचा प्रचार करण्याच्या आपल्या बांधिलकीमुळे आणि दर्जाबाबतच्या निष्ठेमुळे सोसायटी टी पिढ्यानपिढ्या घराघरात लोकप्रिय राहिला आहे.