Published On : Sun, Aug 1st, 2021
By Nagpur Today Nagpur News

कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपूल भूमिपूजन

Advertisement

उत्तर-मध्य नागपूरमधील ट्रॅफिक
जाम संपणार : ना. गडकरी
उमरेडवरून कोळसा आता
2-3 तासात नागपुरात पोहोचेल

नागपूर: उत्तर व मध्य नागपूरला जोडणार्‍या या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होऊन ट्रॅफिक जाम संपणार आहे. हा उड्डाणपूल केवळ अशक्यच होता. पण महारेल यांनी चांगले डिझाईन तयार केल्यामुळे हा उड्डाणपूल होत आहे. तसेच नागपूर ते उमरेड ब्रॉड गेजचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ब्राडगेज मेट्रो सुरु झाल्यानंतर उमरेडपर्यंत 30 मिनिटात आणि 40 मिनिटात ब्रहपुरीपर्यंत आपण पोहोचणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्रीय मार्ग निधीतून ना. गडकरी यांनी या उड्डाणपुलासाठी 150 कोटी रुपये मंजूर केला आहे.

Gold Rate
Monday 20 Jan. 2025
Gold 24 KT 79,600 /-
Gold 22 KT 74,000 /-
Silver / Kg 91,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन आज ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सा.बां. मंत्री अशोक चव्हाण ऑनलाईन या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच महापौर दयाशंकर तिवारी, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, महारेलचा व्यवस्थापकीय संचालक आर. के. जायसवाल उपस्थित होते. भारत सरकार, ऊर्जा विभाग आणि पंजाब नॅशनल बँकेच्या सहकार्याने नागपूर उमरेड ब्रॉडगेजचे काम होत आहे. नागपूर उमरेड हा चार पदरी रोड आपण केला आहे. उमरेड भिवापूर हा रस्ता वनविभागातील अडचणीमुळे चार पदरी होऊ शकत नाही. राज्य शासनाकडून चार पदरीसाठी मंजुरी मिळाली तर आपण उमरेड भिवापूरही चार पदरी करू, असेही ना. गडकरी म्हणाले.

या उड्डाणपुलासोबतच गोळीबार चौकापर्यंत मोठा रोड करणार आहे. या उड्डाणपुलामुळे मोमीनपुर्‍यातील खाली असलेल्या रोडवरील वाहतूक कमी होईल. हा रस्ताही मोठा करणार आहे. पूर्व, मध्य, दक्षिण व उत्तर नागपुरातील जनतेलाही चांगल्या दर्जाचे जीवन जगता यावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. मेयो हॉस्पिटल ते सुनील हॉटेलपर्यंतचा रस्ताही 4 पदरी करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी 2.82 किमी असून या प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये खर्च येणार आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे.

महारेलकडून संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याच्या हेतूने रेल्वे उड्डणपूल आणि भुयारी मार्गांची कामे 90 ठिकाणी सुरु आहेत. या 90 उड्डाणपुलांपैकी 30 उड्डाणपूल एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे विदर्भातील जनतेला याचा फायदा होणार असून त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान होणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केले ना. गडकरींचे कौतुक
कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा उड्डाणपूल भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तोंडभरून कौतुक केले. नितीन गडकरी यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. तसेच दिवसागणिक ते आपले कर्तृत्व सिध्द करीत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ना. गडकरींचे कौतुक केले.
भाजपा सेना युतीच्या काळात मुंबई ते पुणे हे अंतर दोन तासात पूर्ण करण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. ते पूर्ण करण्याचे धाडस नितीन गडकरी यांनी दाखविले व ते स्वप्न प्रत्यक्षात आणून दाखविले. ज्या गतीने तुम्ही काम करता त्यापेक्षा अधिक गतीने तुमची पुढची वाटचाल होवो, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Advertisement