कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी परिसरात एका विवाहित तरुणाने पत्नीशी झालेल्या वैवाहिक कलहाला कंटाळून पत्नी च्या घरासमोरील पेरू च्या झाडाला पत्नीच्याच पांढऱ्या रंगाच्या ओळणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल 21 मे ला रात्री 12 दरम्यान निदर्शनास आली असून मृतक तरुणाचे नाव श्याम पलटु विश्वकर्मा वय 21 वर्षे रा शिव छत्रपती नगर कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक तरुणाचे कुंभारे कॉलोनी रहिवासी काजल दहाट वय 21 वर्षे या तरुणीशी तीन वर्षापूर्वी झालेल्या प्रेमसंबंधातून विवाहबंधनात अडकले व यातून एका अपत्याला जन्म दिल्यानंतर त्या बाळाला दुसऱ्या कुन्या नातेवाईकाला दत्तक दिले मात्र या दोन्ही पती पत्नी मध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून भांडण होणे हे नित्याचेच झाले होते या वैवाहिक कलहाला कंटाळून पत्नी काजल ने नजीकच असलेल्या कुंभारे कोलोणीत माहेर च्या आश्रयाने माहेरी राहायची तर पती वेगळा राहायचा या विभक्त कुटुंबासह सह वैवाहिक कलहाला कंटाळून पत्नी च्या घरासमोरीलच असलेल्या पेरू च्या झाडाला पत्नीच्याच आठवणीत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ओळणीने गळफास लावून आत्महत्या करीत जगाचा अखेरचा निरोप घेतला .घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवित मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले यासंदर्भात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, दोन मोठे भाऊ, एक बहीण असा आप्तपरिवार आहे.