नागपूर : शहरात रविवारी नागपुरात राजीव गांधी यांच्या जयंतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या मंचावर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला कलावती यांनी हजेरी लावली हाती. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला व राहुल गांधी यांची भेट २००८ मध्ये झाली होती. राहुल यांच्या प्रयत्नांमुळे कलावती यांना सरकारी योजनांचा लाभ झाला.तसेच आर्थिक मदत मिळाली होती. या घटनेचा उल्लेख अमित शाहा यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात केला. अमित शाहा म्हणाले होते की, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला कलावती यांना राहुल गांधी यांनी नव्हे तर भाजप सरकारने मदत केली होती. शाहा यांच्या विधानानंतर कलावती यांची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा सुरु झाली.
कलावती यांनी दुसऱ्याच दिवशी शाहा यांचा दावा फेटाळला होता. अमित शाह खोटे बोलत आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मदत केल्यानेच मुलीचा विवाह पार पडल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान विदर्भात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होतात. कलावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातून येतात. २००८ मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना राहुल गांधी यांनी कलावती यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या.
दरम्यान या कार्यक्रमात माजी केंद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार,आमदार विकास ठाकरे , प्रदेश सोशल मिडिया सेल अध्यक्ष व महासचिव विशाल मुत्तेमवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.