Advertisement
नागपूर : कळमना पोलीस ठाण्याअंतर्गत चिखली परिसरात मंगळवारी रात्री एचपी पेट्रोल पंपाजवळील बंद शटरमध्ये संशयित मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉकमध्ये अनेक शटर आहेत जे वारंवार बंद असतात. यापैकी एका शटरमध्ये संशयित मानवी सांगाडा सापडला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनीघटनस्थळी धाव घेत कारवाई सुरू केली आहे. तसेच हा संशयित मानवी सांगाडा फॉरेन्सिक विभागाकडे पाठवला असून तपास सुरू केला आहे.