नागपूर : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला कळमना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.विजयनगर दुर्गा चौक जवळील रामभूमी येथे राहणाऱ्या बाबुलाल वर्मा याने आपल्या पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
फिर्यादी थानसिंग शंकर वर्मा याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपी बाबुलाल वर्मा हा त्याच्या राहत्या घरात होता. त्याने आतून कडी लावली होती.त्यांचे त्यांची बायको असलेल्या सबिरा वर्मा हीची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी दार उघडले असताना त्यांना सबिरा हीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
मृतक महिलेला मुल बाळ होत नसल्याने आरोपी हा कायम दारू पिऊन तिला मारहाण करत होता.त्याच कारणामुळे आज दोघांमध्ये भांडण झाले.यादरम्यान लाकडी दांड्याने मारून आरोपी बाबुलाल याने तिचा खून केला. आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.