नागपूर. खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सॉफ्टबॉल स्पर्धेत कमला नेहरू ॲकेडमी आणि नागपूर डिस्ट्रीक सॉफ्टबॉल असोसिएशन (एनडीएसए) संघाने पुरूष आणि महिला गटात विजय मिळविला.
विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे मंगळवारी (ता.२३) झालेल्या स्पर्धेमध्ये 23 वर्षाखालील वयोगटात पुरूष गटात कमला नेहरू ॲकेडमीने एनडीएसए संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले. सावनेर बॉइज संघाला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. महिला गटात एनडीएसए संघाने कमला नेहरू संघाला मात देत पहिले स्थान पटकाविले. कमला नेहरू ॲकेडमीने दुसरे तर शिवरामपंत तिडके गुरूजी स्कूल संघाने तिसरे स्थान प्राप्त केले.
केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची स्पर्धेला भेट
खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी मंगळवारी विभागीय क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या सॉफ्टबॉल स्पर्धेला भेट दिली व स्पर्धेतील सामन्याचा शुभारंभ देखील केला. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, खासदार क्रीडा महोत्सवाचे सहसंयोजक डॉ. विवेक अवसरे, महाराष्ट्र सॉफ्टबॉल असोसिएशनचे सहसचिव डॉ. सूरज येवतीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक जीजामाता पुरस्कार्थी डॉ. दर्शना पंडीत, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, तिडके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीनल समर्थ, राजेश शेंडेकर, नागपूर जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष केतन ठाकरे, सुमेध कुलकर्णी, नीरज दोंतुलवार आदी उपस्थित होते.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
23 वर्षाखालील वयोगट
पुरूष : कमला नेहरू ॲकेडमी, एनडीएसए, सावनेर बॉइज
महिला : एनडीएसए, कमला नेहरू ॲकेडमी, शिवरामपंत तिडके गुरूजी स्कूल
17 वर्षाखालील वयोगट
मुले : सावनेर बॉइज, जिंदल विद्या मंदिर कळमेश्वर, नूतन भारत विद्यालय नागपूर
मुली : नूतन भारत विद्यालय नागपूर, तिडके विद्यालय नागपूर, कमला नेहरू ॲकेडमी
14 वर्षाखालील वयोगट
मुले : नूतन भारत विद्यालय नागपूर, सावनेर बॉइज, तिडके विद्यालय नागपूर
मुली : संस्कार विद्या सागर, रमेश चांडक स्कूल, टाटा पारसी स्कूल नागपूर