‘कॅम्प टी’ वरून पडले ‘कामठी’नाव
कामठी :-महाराष्ट्र राज्याचे उपराजधानी असलेले नागपूर शहरापासून अवघ्या 16 किमी दूर अंतरावर वसलेल्या कामठी शहराला शहरात असलेल्या लष्करी छावणीमुळे तसेच तिथे असलेले बिडी मजूर आणि विणकामगार मुळे शहराची एक वेगळी ओळख होती मात्र आता शहरात जगविख्यात असलेल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे कामठी शहराचे नाव हे जगाच्या नकाशावर कोरले आहे.
200 वर्षाचा इतिहास लाभलेल्या या कामठी शहराचा इतिहास खूप रोमांचक आहे.सन 1821 साली ब्रिगेडियर जनरल च्या आदेशावरून ब्रिटिश आणि भारतीय लष्कराचे 14 हजार आर्टिलरी,कॅमल कोअर आणो कॅवलरी जवान सिकंदराबाद वरून निघून जवानासह कन्हान नदीच्या दक्षिणेकडील तटावर डेरा टाकून विश्राम करीत असता या कन्हान नदीचे विस्तीर्ण पात्र, तिच्या आजूबाजूला असलेले आंबे, चिंच आणि सागवणाची मोठमोठाली झाडे, पशु पक्षी आणि फुलझाडांचे वास्तव्य ज्यामुळे नयनरम्य आणि शांत असलेला परिसर हा लशकऱ्यांना आवडला आणि त्यांनी या ठिकाणी छावणी उभारण्याचा विचार पक्का केला.सण 1823 मध्ये या परिसरात भोसल्यांचे अधिराज्य होते त्यांनी ब्रिटिश सैनिकांना काही गावाबरोबर कन्हान नदीचा काही भूभाग आणि जमीन दान दिली त्यानंतर लवकरच कामठी शहर हे एक लष्करी छावणी म्हणून विकसित झाली त्यानंतर वेळेनुसार ब्रिटिश आणि भारतीय रेजिमेंटच्या तुकड्या या छावणीत तैनात करण्यात येत होत्या त्यांना प्रशिक्षण दिले जात होते.
इंग्रजांच्या राजवटीपासून कामठी शहरातील कॅन्टोमेंट परिसर हा लष्कराच्या ताब्यात होता त्या काळात या परिसरात गोरा मिलिटरी जवान राहत असल्यामुळे त्याला गोरा बाजार आणि काळे जवानांचे ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्याला कमसरी बाजार(कॅलोरी बाजार) असे म्हणत होते.कामठी शहरातील सध्याच्या माल रोड भागात त्यांचे वास्तव्य होते.मालरोड भागात इंग्रजांचे गोडाऊन असल्यामुळे त्याला ‘मालरोड’असे नाव पडले होते.त्यावेळी कामठी शहरात बिडी तयार करणाऱ्या कामगारांची आणि विणकरांची मोठ्या प्रमाणात वस्ती होती.
1972 पूर्वी या शहरात ई एम ई नावाचे लष्करी सेंटर होते.काही वर्षे या सेंटर ने या ठिकाणी कार्य केले त्यानंतर शहरात गार्डस रेजिमेंटल सेंटर ची स्थापना करण्यात आली.कामठी शहर हे दोन भागात विभागले असून एक कामठी छावणी परिषद क्षेत्र तर दुसरे कामठी नगर परोषद आहे.हे दोन्ही क्षेत्र कामठी तहसील अंतर्गत समावेश आहेत.
ब्रिटिश काळात वसलेल्या कामठी शहरातील लष्करी छावणीत राहणाऱ्या सैन्याच्या खान्या पिण्याची तसेच राहण्याची व्यवस्था होती .जे इंग्रज लष्करी अधिकारी केवळ नागपूर हुन या कॅम्प मध्ये येऊन चहा घेत होते त्यांच्या वारंवारच्या ‘कॅम्प टी’या उच्चरामुळे त्याला पुढे कामठी असे नाव पडले .अशा या कॅम्प टी वरून कामठी असे नामकरण झालेले कामठी शहराचे नाव विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे जगाच्या कोण्या कोपऱ्यात पोहोचून जगाच्या आंतरराष्ट्रीय नकाशात कामठी शहराचे नाव कोरलेले आहे.