– ओबीसी नगरसेवकांचे सर्वेक्षण पूर्ण-कामठी नगर परिषद च्या सन 1961 ते 1994 पर्यंत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांची माहिती केली संकलित
कामठी :-ओबोसींच्या राजकीय आरक्षणासाठी कामठी नगर परिषद ने युद्धस्तरावर सर्वेक्षण मोहीम राबवली.अवघ्या काहीच दिवसात 1961 ते 1994 च्या कालावधीत नगर परिषदेत ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांची माहिती संकलित केल्या गेली.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक ओबीसींच्या स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाबाबत याचिकेवर सुनावणी करताना राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेली माहिती फेटाळली आहे.याच संदर्भात नवीन माहिती घेऊन पुन्हा न्यायालयाकडे यावे असा आदेश दिला आहे.त्यानंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ नये यासाठी एक कायदा पारित करून घेतला आहे.तसेच आधी केलेली प्रभाग रचना रद्द केली.
ओबीसी वर्गाच्या राजकिय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता हा कायदा तयार करण्यात आला आहे मागिल आठवड्यात राज्य मागासवर्ग आयोगाने नगर परिषद ला पत्र पाठवून ओबीसी नगरसेवकांची माहिती मागवली होतो त्यामुळे ही माहिती कामठी नगर परिषद ने पूर्ण केली असून ओबीसी आरक्षण कायम करण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात माहिती सादर करायची आहे.