कामठी :-कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढीवर असून रुग्णांची मृत्यूसंख्या सुदधा वाढीवर आहे.मात्र या परिस्थितीही कामठी नगर परिषद प्रशासन गांभीर्याची भूमिका घेत नसल्याने नगर परिषद प्रशासनाने या बिकट परिस्थितीत कोरोना नियंत्रणासाठी पुढाकार घ्यावा या मागणीसाठी आज कांग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
कामठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दैनंदिन प्रत्येक वार्डात फवारणी, सॅनिटायझेशन , ब्लिचिंग पावडर फवारणी, आदी करीत नियंत्रण ठेवण्यात यावे, नगरसेवकांच्याया परवानगी शिवाय सफाई कर्मचाऱ्यांची इतरत्र वार्डात बदली करण्यात येऊ नये, नझुल जागेवरील नागरिकांना स्थायी पट्ट्याचे वितरण करण्यात यावे यासारख्या अनेक मागण्यासाठी सामूहिक निवेदन देण्यात आले.
हे निवेदन माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात देण्यात आले याप्रसंगी नगरसेवक काशिनाथ प्रधान, मो आरोफ, मो आसिफ, ममता कांबळे, रशीद अन्सारी, एहत्येश्याम, अनवर पटेल,इर्शाद शेख, आदी कार्यकर्ता गण प्रामुख्याने उपस्थित होते.
– संदीप कांबळे,कामठी