कामठी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाखा कामठी च्या वतीने ता 6 ऑक्टोबर ला तहसील कार्यालय समोर केंद्र व राज्य सरकारने वाढविलेल्या महागाई विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले
या धरणे आंदोलनात मंचकावर विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये, प्रदेश सचिव जगदीश पंचबुंधे, महिला जिल्हाधेक्ष अर्चनाताई हरडे,जी प सदस्य उज्वलाताई बोढlरे विध्यार्थी जिल्हाधेक्ष राहुल कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसाडे श्याम मंडपे विनोद हरडे राजू राऊत तालुका अध्यक्ष शोएब असद, शहराधेक्ष नौशाद सिद्धीकी,कार्याध्यक्ष दिनेश पाटील, कमलकिशोर करवा इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती
उपस्थित मान्यवरांनी केंद्र व राज्य सरकारने दैनंदिन जीवनातील वाढविल्या महागाई विरोधात आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला व त्यानंतर वि प स प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात तहसीलदार बाळासाहेब टेळे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सांगितले की केंद्रात व राज्यात भाजपा सरकारने सामान्य नागरिक,व्यापारी वर्ग, हातमजूर,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती, महिला वर्ग, कर्मचारी वर्ग अश्या सर्वच स्तरातील जनता महागाईने त्रस्त झाले आहे.
त्यातच पेट्रोल, डिझेल, गैस चे दरवाढ, शिष्यवृत्ती बेरोजगारी ,शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारी खोटी आश्वासने महावितरण कंपनीने ग्राहकांच्या बिलात 16% ने वाढ,पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेकडून हेल्मेट सक्ती च्या नावाखाली लूट शैक्षणिक कमी अनुभव असणाऱ्या युवकांकडून मीटर रिडींग,ए पी एल, बी पी एल रेशन कार्ड धारकाचे अनाज कमी करणे अश्या अनेक समस्या निवेदनातून दिल्या आहेत
याप्रसंगी अनिता घोडेस्वार, अनु डायरे,माया डायर