पणजी येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र मिनी गोल्फ संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकाची कमाई केली. सांघिक प्रकारातील महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये एम कॉम द्वितीय वर्षाला शिकत असलेली कु. कंचन दुबे च्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनामुळे सुवर्णपदकाचा बहुमान प्राप्त झाला.
तसेच या स्पर्धेकरिता महाविद्यालयातील दिपन्श्यु मिश्रा याने स्पर्धा अधिकारी म्हणून कामगिरी पार पाडली.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल कंचन दुबे व स्पर्धा अधिकारी म्हणून दिपन्श्यु मिश्रा यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओ एस देशमुख यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्यात. या वेळी विभाग प्रमुख डॉ देवेंद्र वानखडे, डॉ सुभाष दाढे, डॉ वंदना इंगळे, जयंत जिचकार सह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही अभिनंदन केले.