Published On : Wed, Sep 27th, 2017

कांद्री ला वेकोलि कर्मचा-या वर प्राणघातक गोळीबार

कन्हान : कामठी येथील जगदीश श्रावणकर सकाळी ६ वाजता वेकोलि कामठी कॉलरी खुली खदान येथे मोटरसायकलने कामावर (नौकरीवर)जाताना कांद्री बस स्टाप जवळ मागुन दोन अज्ञात आरोपींनी दोन ते तीन बंदुकीने गोळीबार करून जखमी करून मनसर च्या दिशेस मोटरसायकलने पळुन गेले. जखमी ला जे एन दवाखान्यात नेले असता उपचाराची व्यवस्था नसल्याने कामठी व पुढे प्रकृती गंभीर असल्याने मेयो रुग्णालयात नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

वेकोलि कामठी कॉलरी खुली खदान येथे डिझेल पंप वर कार्यरत श्री जगदीश शालीकराव श्रावणकर वय ४९ वर्ष मु मच्छी पुल राम मंदिर कामठी हे सकाळी ६ वाजता दरम्यान स्वत:च्या बुलेट मोटरसायकल क्र एम एच ४० ए एच ८२२४ ने कामठी खुली खदान येथे कामावर जाता होते. यावेळी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री बस स्टाप जवळ मागुन मोटरसायकलने दोन अज्ञात आरोपींनी येऊन अचानक बंदुकीने गोळी मारली, थोडया सामोर जावुन दुसरी, तिसरी गोळी मारली. यावेळी आरोपींच्या घाईगडबडीत बंदुक खाली पडली व आरोपींचा तोल गेल्याने ते मोटरसायकलसह खाली पडले. जीव वाचविण्यासाठी गंभीर जखमी जगदीशने आपली मोटरसायकल वळवुन कांद्री गावातील नवदुर्गा मंडळाजवळ पोहचुन वाचविण्याची विनंती केली.

Gold Rate
Monday 27 Jan. 2025
Gold 24 KT 80,400 /-
Gold 22 KT 74,800 /-
Silver / Kg 90,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी काही व्यकतीने त्वरेने वेकोलि च्या जे एन दवाखान्यात नेले, येथे उपचाराची व्यवस्था बराबर नसल्याने कामठी येथील आशा व रॉय खाजगी रुग्णालयात नेले. परंतु गोळी कमरेच्या आत असल्याने प्रकृती गंभीर, चिताजनक पाहुन तेथेही न घेतल्याने मेयो रुग्णालयात नागपूर ला नेऊन उपचारार्थ दाखल करण्यात आले.

जगदीश श्रावणकर हे वेकोलि कोळशा खदान मध्ये डिझेल पंप वर कार्यरत आहेत. या कोळशा खाणी मध्ये कोळशा, लोखंड, डिझेल, तांब्याची तार चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने डिझेल च्या प्रकरणातुन शुध्दा आरोपींनी गोळीबार करून जिवेमारण्याचा प्रयत्न केला असवा. अशी नागरिकांत चर्चा होती
कन्हान पोलीस व थानेदार रविंद्र गायकवाड घटनास्थळी उशीराच पोहचले. पोलीस अधीक्षक बलकवडे, सहा.अधीक्षक नरसिंग शेरखाने, गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय पुरंदरे, पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे हयानी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सुत्रे सुरू केले.

कन्हान शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होऊन सुध्दा कन्हान परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून शांती सुव्यवस्था कायम नसल्याने सर्वसामान्यात भितीचे वातावरण निर्माण होत आहे. ठाणेदार गायकवाड यांच्या वादग्रस्त कार्य प्रणालीमुळे कन्हान पोलीस स्टेशन परिसरात तीनदा मोठ्या प्रमाणात डकेती व गोळीबाराचे गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस अधीक्षक बलकवडे यानी गायकवाड यांच्या वर कुठलीही कारवाई केली नाही. कन्हान जवळ वेकोलिच्या तीन खुल्या कोळशा खाणी असुन येथे अपघाता होत असल्याने वेकोलिच्या कर्मचा-या करिता ५० बेडचा कांद्री ला दवाखान्यात बनविण्यात आला परंतु वेकोलिच्या दुर्लक्षामुळे वेकोलिचा हा दवाखाना कर्मचा-याचा सुध्दा वेळेवर उपचार होऊ शकत नसल्याने वेकोलि चा हा दवाखाना पांढरा हत्ती झाला आहे.

Advertisement