Published On : Mon, Sep 25th, 2017

कन्हान ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद संपन्न.

Advertisement

कन्हान: बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पार्टी व्दारे ” आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषद नुकतीच कुलदीप भवन, रायनगर नागपूर जबलपूर रोड कन्हान येथे आयोजित परिषदेत आरक्षण विरोधी षडयंत्र हाणुन पाडण्यास तन, मन, धनाने सहकार्य करावे. असे मान्यवरांचे उपस्थितीना आवाहन करून परिषद संपन्न झाली.

आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेचे प्रमुख मार्गदर्शिका मा. छायाताई कुरूडकर बी.आर.एस.पी. संयोजिका महिला मोर्चा विदर्भ राज्य व मा.हरिकिशन हटवार, प्रबोधनकार यांच्या अध्यक्षेत आणि प्रमुख वक्ते मा. विशेष फुटाणे, महासचिव विदर्भ राज्य., मा. अर्जुन राऊत, मा. सत्यवान गायकवाड, मा.सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीण, मा. अरूण सहारे उपाध्यक्ष नागपूर जिल्हा, मा हरिदास चिंटोले उपाध्यक्ष रामटेक विधानसभा, मा जानबा डोंगरे आदी मान्यवर प्रमुखाने उपस्थितीत होते.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारतात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानाने सर्व मागासलेल्या लोकांसाठी आरक्षणाचे तत्व स्विकारले. परंतु मनुवादी सत्ताधा-याकडुन आरक्षण धोरणांची योग्य अमलबजावणी न झाल्यामुळे बराच मोठा वर्ग आरक्षणापासुन वंचित राहिला. अलिकडे केंद्र व राज्य सरकारनी आरक्षण समाप्त करण्याच्या दिशेने पाऊले उचलायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.त्यामुळे दलित, आदीवासी, भटक्या विमुक्त जाती, ओबीसी तथा अल्पसंख्यांक समुदायांचे सर्व नागरिकांनी या आरक्षण निती समाप्ती षडयंत्राच्या विरोधात सर्वसामान्य बहुसंख्यांकानी आपआपला आवाज बुंलद करावा. तसेच आमदार, खासदारांनी विधानमंडळ आणि संसदेत आवाज उठवावा.

अशी अपिल बी आर एस पी तर्फे मार्गदर्शिका छायाताई कुरूडकर हयांनी केली. या संदर्भात बी आर एस पी व्दारा नुकतीच गुरूवार ला आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेचे कुलदिप भवन, रायनगर जे एन रोड कन्हान येथे आयोजित परिषदेचे अध्यक्ष मा. प्रबोधनकार हरिदास चिंटोले हयांनी प्रस्तुत परिषदेत सार्वजनिक नोक-यांचे खाजगीकरण, गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या दलित-आदीवासी उमेदवारांना आरक्षित कोटयात बंदिस्त करून त्यांना जातीव्यवस्थेचे वाहक बनविणे, गैर दलित-आदीवासीना नौकरी-शिक्षण आणि राजकारणात प्रोत्साहन देणे त्यांना संरक्षित करणे या सर्व बाबींचा भाजपा राज्यात संविधानिक आरक्षण समाप्त करण्याचा सरकारी आणि प्रशासकीय सुनिश्चित षडयंत्राचा बी आर एस पी कडुन तिव्र विरोध करून गरज लक्षात घेऊन पुर्ण राज्यात जनआंदोलन उभारले जाईल तसेच कायदेशिर मार्गाचा अवलंब करून योग्य ती पाऊले उचली जातील. यास्तव सर्व बहुजनानी आरक्षण विरोधी षडयंत्र हाणुन पाडण्यास तन, मन, धनाने सहकार्य करण्याचे सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. असे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातुन संबोधिले.

आरक्षण विरोधी षडयंत्र पर्दाफाश परिषदेच्या यशस्विते करिता श्रीराम रंगारी, विलास खडसे, चेतन चव्हाण, अरूण सांबारे, राहुल जोहरे, क्रिष्णा बावनकुळे, अमोल चिमणकर, प्रज्वल सिंगाडे, आशिष देशभ्रतार, मोनु रामटेके, विनित नागदेवे, प्रज्वल धुर्वे, विनोद ऊके, प्रकाश वासनिक, वामन धोंगळे, सुनिल वासनिक, पुथ्वीराज बेलेकर, राजकुमार चव्हाण, विजय लोणारे, दिलीप रामटेके, रोशन गेडाम, प्रकाश बडोले, अरविंद बोरकर, सुहास बर्वे, प्रल्हाद खोब्रागडे, सतिश नौकरकर, बंडु बावने, प्रमोद गायधने, राकेश निमर्ते, नितेश साखरकर, अर्जुन सेलोकर, मनिष पाटील, विद्याधर मेश्राम, मंदा डुले, कलावती महाजन, रेखा धमगाये, प्रभावती दुपारे, सिमा रामटेके, जिजाबाई वाहणे, मिनाक्षी रंगारी, मंगला वासनिक, उषाताई सांगोडे, दुर्गाताई निकोसे, प्रतिमा चौरे, प्रमिला घोडेस्वार, दुर्गा गजभिये, वच्छला कळमकर, ज्योती मोटघरे, अनिता चहांदे, माया वाघमारे, शारदा वाळके, संध्या साखरे, दुर्गा डोंगरे, विजया निकोसे, अनिता वाघमारे, मायाताई बेलेकर, सुजाता साहारे, राजश्री पाटील, वर्षा फुटाणे, छायाताई हुड,केसरबाई मेश्राम, मिनाताई हुड आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्तानी मोलाचे सहकार्य केले.

Advertisement