आशी नगर आणि सतरंजीपूरा झोन्समधील ९ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…
शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा बंद राहणार..
नागपूर,: : कन्हान जलशुद्धीकरण केंद्र वरून शहरातील उत्तर आणि पूर्व नागपुरातील.. ९ जलकुंभांना जोडणाऱ्या ९००- मी मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर साई मंदिर मागे , पिली नदी जवळ, कामठी रोडवर तसेच ऑटोमोटिव्ह चौक येथे , अश्या २ मोठ्या गळत्या आढळून आल्या आहेत आणि त्यातून प्रचंड प्रमाणात पिण्याचे पाणी वाहून जात असल्यामुळे ह्या गळत्यांना तातडीने दुरुस्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिका आणि व ऑरेज सिटी वॉटर ह्यांनी संयुक्तपणे २८ तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंद्र-९०० मुख्य जलवाहिनेचे शटडाऊन- फेब्रुवारी ७ (सोमवार ) सकाळी १० ते फेब्रुवारी ८ (मंगळवार ) दुपारी २ वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे .
ह्या गळतीला लवकरात लवकर दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या गळती ची दुरुस्ती करण्यासाठी फक्त कन्हान जलशुद्धीकरण केंद्र ९०० मुख्य जलवाहिनीचे चे पम्पिंग बंद करण्यात येणार आहे …पण ह्या दरम्यान कन्हान-१३०० आणि कन्हान-६०० ह्या दोन्ही जलवाहिनी चे पम्पिंग सुरु राहील.
या कामांमुळे आशी नगर आणि सतरंजीपूरा झोन्समधील जवळपास ९ जलकुंभांचा.. आशी नगर झोन: इंदोरा , बेझनबाग, बिनाकी -१, बिनाकी-२, बिनाकी -३, इंदोरा -२ (गमदूर डायरेक्ट टॅप ) आणि सतरंजीपूरा झोन : बस्तरवारी-१, बस्तरवारी २ , बस्तरवारी -३ पाणीपुरवठा फेब्रुवारी ७ (सोमवार ) सकाळी १० ते फेब्रुवारी ८ (मंगळवार ) दुपारी २ वाजेपर्यंत बाधित राहणार आहे . ह्या कालावधी दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर फेब्रुवारी ८ (मंगळवार) दुपारी २ वाजे नंतर, पाणीपुरवठा वेळेनुसार बाधित भागामध्ये पाणी पुरवठा सुरु होणार आहे .
ह्या २८ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे झोन आणि जलकुंभ
सतरंजीपुरा झोन:
बस्तरवारी १ जलकुंभ : प्रेम नगर, नारायण पेठ, बस्तरवारी, खैरी पुरा, लालगंज, बाहुली विहीर, कुंभारपूरा , बस्तरवारी, तेलीपुरा पेवठा, बारी पुरा , दही बाजार, कौमीबाग, बस्तरवारी माता मंदिर, गोंड पुरा, स्वीपर कॉलोनी, कोलवाडकर मोहल्ला , बैरागी पुरा मस्कासाथ, इतवारी, नेहरू पुतळा , परमार पपुरा, तेली पुरा
बस्तरवारी २ जलकुंभ : नामदेव नगर, HB टाऊन , बापू अणे नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, वृन्दावन नगर , साहू मोहल्ला, कोलबास्वामी नगर, जामदार वाडी, बोहरा कंपाउंड , किनखेडे-ले-आउट, पोळा मैदान, मेहंदि बाग रोड ,. पाठराबे वाडी, आनंद नगर, जोशीपुरा, हुडको कॉलोनी, नासुप्र कॉलोनी.
बस्तरवाडी-३ जलकुंभ : विणकर कॉलोनी, महाजनपूरा, मुसलमान पुरा, लाल दरवाजा, संभाजी कासार, राम नांगर, बंगला देश, दत्त मंदिर, चंद्रभागा नगर, उमाठेवाडी, लेंडी टाळावं, बैरागी पुरा, कुंभार पुरा, लादपूर, नांदगिरी रोड, स्वामी नगर, बापू बनसोड चौक , प्रकाश पण मंदिर गल्ली, चंद्रभागा नगर
आशी नगर झोन:
इंदोरा जलकुंभ : नवीन इंदोरा, मोठा इंदोरा, मिसळ ले आउट, श्रावस्ती नगर , बाराखोली , RPI कॉलोनी , इंदोरा झोपडया , चंक्स कॉलोनी, इंदोरा माता टेकडी, ठवरे कॉलोनी, नवीन ठवरे कॉलोनी, जुनी ठवरे कॉलोनी, विद्या नगर, माया नगर, पंजाबी कॉलोनी, लघु वेतन कॉलोनी, आंबेडकर कॉलोनी, खदान ले आउट,
बेझनबाग जलकुंभ ; लुम्बिनी नगर, दिलीप नगर, नझूल ले आउट, जुना जरीपटका, कमल चौक, दयानंद नगर, एम्प्रेस मिल वसाहत, सुदर्शन कॉलोनी, भागाबाई ले आउट, चौधरी चौक ते सेठिया चौक, जरीपटका , वेकोलि रोड, महावीर नांगर, बेझनबाग , दयाळू सोसाटी, बेझनबाग -बी ले आउट, बेझनबाग-c ले आउट, , जरीपटका पार्ट मेंन बाजार .
बिनाकी-१ जलकुंभ : हमीद नगर, योगी अरविंद नगर, सरोदबाद, भासले वस्ती, मेहबूब पुरा, संघर्ष नगर, पांडे वस्ती, संजीवनी वसाहत, प्रवेश नगर, संगम नगर, गरीब नवाझ नगर, शिव शक्ती नगर, यशोधरा नगर, पावन नगर, संजय गांधी नगर, इंदिरा माता नगर, धम्मदीप नगर, विश्वशांती बुद्ध विहार चा भाग,
बिनाकी-२ जलकुंभ : यादव नगर, चिमुरकर ले आउट, स्वीपर कॉलोनी, एकता कॉलोनी, सुदाम नगर, हौसिंग बोर्ड कॉलोनी , बंडे नवाझ नगर, प्रबुद्ध नगर पंचवटी, नागोबा मंदिर गोंड मोहल्ला, आदिवासी नगर आणि इतर भाग , पंचकुवा, नायी बसती, खंत नगर, यशोदीप कॉलोनी
बिनाकी-३ जलकुंभ : महेंद्र नगर, क्खणते नगर, यशोदीप कॉलोनी, आदर्श नगर, पंचशील नगर, सुजाता नगर, बापू पाटील वाडी, हनुमान सोसाटी, फारूक नगर, बाबा बुद्ध नगर, हबीब नगर वैशाली नगर, आंबेडकर गार्डन, साईबाबा मंदिर, बंकर कॉलोनी, तेलंग लाईन आणि इतर भाग
इंदोरा -२ (गमदूर डायरेक्ट टॅप ) जलकुंभ : भवानी लाईन, टेक, हबीब नगर, नवीन बस्ती, कंठी रोड, देवी नगर, मुकुंद नगर, मदिना मस्जिद लाईन, ताज नगर, बाळाभाऊ पेठ, अशोक नगर, गुरुनानकपूरा, तथागत बुद्ध विहार लेन
या दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे, अधिक माहितीकरिता मनपा -OCW TFN १८००-२६६-९८९९ वर संपर्क करावा