कन्हान: अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक (अँट्रासिटी) कायद्यात बदल न करता कठोर कार्यवाही करण्या बाबत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची देशभरात होत असलेल्या विटंबना थांबविण्याबाबत आंबेडकरी चळवळीच्या वतीने २ एप्रिल २०१८ सोमवार ला भारत बंद चे आवाहन करण्यात आले होते. या बंद च्या समर्थनात कन्हान येथेही शांततेत बंद पाळण्यात येऊन मा. महामहीम राष्ट्रपती , भारत सरकार हयाना तहसीलदार पारशिवनी मार्फत निवेदन देऊन न्याय हक्काची मागणी करण्यात आली.
देशातील अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायद्याला (अँट्रासिटी अँक्ट) सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय हा योग्य नसुन हानीकारक आहे. त्यामुळे मागासवर्गीय समाजावर दुरगामी वाईट परिणाम होणाची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे समाजात फार असंतोष निर्माण झाला असून जनता भयभीत झालेली आहे. वर्षानुवर्षे जो समाज ब्राम्हणवादी व मनुवादी विचारसरणीमुळे मागासलेला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधाना व्दारे मिळालेल्या कायद्यानुसार सन्मानाने जगत आहे. परंतु या देशातील मनुवादी विचारसरणीने पुन्हा त्यांच्या वर गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न केल्याचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सिध्द होते. तसेच ज्या महामानवाने देशाची राज्य घटना लिहुन समाजाला समानतेचा अधिकार दिला. त्यांच्या पुतळ्याची देशभरात विटंबना ही गंभीर बाब असून त्यावर आपण कठोर कार्यवाही करण्याकरिता योग्य आदेश दयावे. अन्यथा समाजात असंतोष पसरत असुन जनता पुढे हिसंक वळण घेऊन कायद्या हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाही. तसेच भिमा कोरेगाव मधिल हिसंक कार्यवाही करण्याकरिता चिथावणी देऊन लोकांना भडकवणारा आणि त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्यारा देशद्रोही संभाजी भिडे यास त्वरित अटक करण्याचे आदेश दयावे. अशी विनंती निवेदन व्दारे केली आहे.
अनुसुचित जाती/जमाती च्या न्याय हक्का करिता तसेच जुलमी प्रकाराच्या निषेधार्थ युवा वर्ग मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला असुन कन्हान येथील गांधी चौक नाका नंबर ७ आणि गहुहिवरा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात नायब तहसिलदार पी.आर. आड़े व पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकड़े यांचे मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासन विरोधात चांगलाच रोष व्यक्त करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकड़े, कन्हान पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी शहरात दंगा नियंत्रक पथकासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्यात रिपब्लिकन भीमशक्ति महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष चंद्रशेखर भीमटे ,भगवान नितनवरे, अश्वमेघ पाटिल, प्रेम रोडेकर, विनायक वाघधरे, दौलतराव ढोके, गणेश पानतावने, किशोर बेलसरे, कैलास बोरकर, नरेश बर्वे , संजय सत्येकार, मनोज गोंडाणे , सुखलाल मड़ावी, रामलाल पटटा, प्रदीप परते, प्रशांत वाघमारे,शैलेश दिवे, सिद्धार्थ ढोके, मयूर माटे, सतिश भसारकर, विपिन गोंडाने, प्रशांत पाटिल, मनीष भिवगड़े, सन्दीप शेंडे, पंकज रामटेके, बाळा मेश्राम , रोहित मानवटकर सहित शेकडो कार्यकर्ते व महिलागण उपस्थित होत्या.