Published On : Tue, May 11th, 2021

कन्हान पोलीसांनी कांद्री ला धाड मारून जुगार पकडला.

Advertisement

– दहा आरोपीना पकडुन ३,७५, ३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीवरून सापळा रचुन हरिहर नगर कांद्री येथे धाड मारून जुगार खेळताना दहा आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील ५२ पत्ते, ३ दुचाकी, ४ मोबाईल, डावावरील नगदी ३५३६० रू असा एकुण ३७५३६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करित कारवाई करण्यात आली आहे.

Gold Rate
18 April 2025
Gold 24 KT 95,900 /-
Gold 22 KT 89,200 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवार (दि.१०) मे ला मा. परी.पो उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर हयांना पेट्रो लिंग दरम्यान प्राप्त गुप्त माहीती वरून पोलीस अधि कारी व कर्मचा-यासह एस व्ही एस कॅटर्स च्या बाजुला सार्वजनिक स्थळी हरिहर नगर कांद्री येथील सार्वजनि क स्थळी जुगार खेळताना सापळा रचुन सायंकाळी १७.१० ते १८ वाजता धाड मारली असता आरोपी
१) सचिन नथुजी पटले (२५) वर्ष रा हनुमान मंदीर जवळ कांद्री,
२) प्रकाश रवी सिंग (२४) वर्ष रा वार्ड क्र ३ कां द्री,
३) शुभम रवि गजभिये (२२) वर्ष रा खदान नं ६,
४) अक्षय गुणवंतराव कुंभलकर (२१) वर्ष रा टेकाडी,
५) राधेश्याम मधुकर सातपैसे (३८) रा टेकाडी,
६) शंकर हरी ऊईके (३७) रा बोरबन वार्ड क्र ३ पारशिव नी,
७) अलताफ हाफीज शेख (२६) रा इंदिरानगर बोरबन पारशिवनी,
८) सुमित दिपक दिवे (२९) रा गणेश नगर कन्हान,
९) शुभम पुथ्वीराज मेश्राम (२३) रा वार्ड क्र ३ कांद्री,
१०) सुनिल क्रिष्णा बोबडे (३५) रा हरिहर नगर कांद्री यांना ५२ तासपत्यावर पैश्या ची हारजित खेळताना बाजीवरील नगदी ३५३६० रूपये सह रंगेहाथ पकडुन त्याच्या ताब्यातील यामाहा एफझेडएस दुचाकी क्र एम एच ४९-एस ००५८ किंमत १ लाख १० हजार रू, सुझकी दुचाकी एमएच ४० बी बी ७८२८ किंमत १ लाख २० हजार रू, स्पेंडर दुचाकी एमएच ४० एम ८८६३ किंमत ७० हजार रू ओपो कंपनीचे २, विवो कंपनीचा १, एमआय कंपनीचा १ असे ४ अँन्डाईड मोबाईल किंमत ४० हजार रू असा एकुण ३,७५,३६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे पोशि संजय बरोदिया यांचा लेखी तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला कलम १२ मजुका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस सुचना पत्रावर सोडुन तपासात घेतला आहे.

नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्ष क मा राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माखणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी मुखत्तार बागवाण यांच्या मार्गदर्शनात परी.पो.उप अधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर, सपोनि सतिश मेश्राम, एएस आय येशु जोसेफ, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, सुधिर चव्हाण, चालक नापोशि संदीप गेडाम आदीच्या सह कार्याने शिताफितीने धाड मारून आरोपीस जुगार खेळताना रंगेहाथ पकडुन कारवाई केली.

Advertisement
Advertisement