नागपुर: एकता सार्वजनिक शारदोत्सव मंडळ, सावरबांधे लेआऊट तर्फे प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. झेंडावंदनानंतर प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीमध्ये ट्रॅडिशनल मार्शल आर्ट कराटे असोसिएशन चे वय वर्ष 10 ते 22 पर्यंतचे विद्यार्थी व सर्व नागरिक उपस्थित होते.
यानंतर कराटे प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. या प्रसंगी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरावर कराटे मध्ये प्रावीन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
यावेळी ट्रॅडिशनल मार्शल आर्ट कराटे असोसिएशन चे संचालक प्रवीण तिवारी, डॉ. बाबुलाल तिवारी, श्री प्रकाश शुक्ला, संजय शर्मा, भाजपा अध्यक्ष हुडकेश्वर मनोज लक्षणे, मनोहररावजी सावरबांधे, राजाभाऊ रेवतकर, दिलीप सुर्वे, संजय उमप, रवींद्र वरंभे, राहुल खळतकर, राकेश जयस्वाल, नितीन चांड, प्रवीण वीरूळकर, महेंद्र ठाकरे उपस्थित होते.