Advertisement
– कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजप खूपच मागे आहे. भाजप- ७३, काँग्रेस- १२१, जेडीएस- १८, इतर- २ जागा मिळाल्या आहेत.
कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी युद्ध पातळीवर तयारी केली हाती.
कर्नाटक विधानसभेचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याच्या जेडीएसच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचे दिसते.