कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या प्रचाराच्या रणधुमाळीनंतर आज मतदानाला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या तीन पक्षांमध्ये प्रमुख लढत होत असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानाचे लाइव्ह अपडेट्स…
कर्नाटक: भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनी शिमोगामधील शिकारपूर येथील मतदान केंद्रात केलं मतदान
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते सदानंद गौडा यांनी पुत्तूरमध्ये केलं मतदान
कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात. २२२ जागांवर होत आहे मतदान