नागपूर. करवीर सोलुशन तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे मेट्रो रेल चालिका श्रीमती प्रीती सुधवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मंचवर करवीर सोलुशन ची अध्यक्षा श्रीमती छायाताई वझलवार आणि श्रीमती सविता मंगलगिरी उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमचा शुभारंभ केला.
याप्रसंगी श्रीमती छायाताई वझलवार यांच्या हस्ते श्रीमती प्रीती सुधवाड यांचा साडी, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराचा उत्तर देतांना प्रीती सुधवाड यांनी सांगितले कि महिला आता कुठल्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाही. त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. श्रीमती वझलवार यांनी सांगितले कि मेट्रो रेल सारख्या क्षेत्रात प्रीती सुधवाड यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात कु मृणाल काटे यांनी समूहगीतच्या माध्यमाने केली. जयश्री मुदलियार यांनी सांगितले कि व्यवसाय मध्ये सुद्धा महिला नेतृत्व करू शकतात.
श्रीमती नंदिता सोनी यांनी एक कविता सादर केली. कार्यक्रमाचे संचालन मृणाल काटे यांनी केले आणि आभार सचिव सविता मंगलगिरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता संजीवनी चौधरी, अनुराधा रघुते, अश्विनी घाटे, कुमुदिनी देशमुख, माधवी सूपसांडे , इंदिरा कवाडे, कल्पना गणवीर, माया ढोके , सुनैना खाडे, पूजा किरणांकर , पल्लवी भागात, सुषमा दामोधरी , नीलिमा धोके, शोभना हूड इत्यादी उपस्थित होत्या.