काटोल :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत व संपूर्ण मराठी मनावर अधिराज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त काटोल शहरात विविध संघटनांच्या वतीने एकत्रितपणे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
शिवरत्न सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, रक्तदान शिबीर तसेच मोठ्या प्रमाणात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात मराठा लान्सर्स, विदर्भ युथ क्रिडा मंडळ, एकता स्पोर्टिग क्लब, माजी सैनिक संघटना, मराठा सेवा संघ, मराठा समाज, हनुमान व्यायाम शाळा, टॅंगो चार्ली, फ्रेंड्स क्लब, राजे ब्रिगेड, तनिष्का व्यासपीठ, जिजाऊ ब्रिगेड, शेर शिवाजी संघटना,संघर्ष संघटना, तिरंगा महिला मंडळ, राजुस जीम, सुर्योदय कराटे ट्रेनिंग स्कुल, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, लोकमान्य टिळक मंडळ, बिरसा मुंडा ब्रिगेड, साहीत्यरत्न अन्नाभाऊ साठे समिती हॅपी क्लब युवा शक्ती क्रिकेट क्लब माॅं चंडिका क्रिकेट क्लब यासह इतर अनेक संघटनांनी सहभाग घेतला होता. तर दुसरीकडे प्रहार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष दिनेश निंबाळकर व शहराध्यक्ष आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शोभायात्रा काढण्यात आली यात दिव्यांग बंधु भगिनींचा तसेच इतर सदस्यांचा सहभाग होता.