विविध क्षेत्रातील ‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
नागपूर, : नागपूर शहराला गौरवशाली इतिहास आहे. या इतिहासामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यलढा ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, उद्योग, व्यापार, साहित्य, प्रशासकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देत आपल्या नागपूर शहराचे नावलौकिक ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे. शहराचा अभिमान असलेल्या या व्यक्तींचा इतिहास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी त्याची पुस्तकरुपी भेट पुढील पिढीला द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी करीत यासाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातर्फे पुढाकार घ्यावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट सिटी आणि सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याअंतर्गत स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शासकीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कलावंत, माजी सैनिक, सेवानिवृत्त अधिकारी, क्रीडा पुरस्कार विजेते, साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा शुक्रवारी (ता.१) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी होते. मंचावर आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती व घरबांधणी विशेष समिती सभापती हरीश दिकोंडवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त विजय देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, सचिव सुरेश रेवतकर, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, हनुमान नगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, समाजातील सर्वांगीण क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणाऱ्या व्यक्तींप्रति ऋण व्यक्त करीत त्यांचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेला सत्कार ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. देशाच्या स्वतंत्र्य संग्रामातील संघर्ष, देशाची जडणघडण ते अनेक मोठ्या नेत्यांची नागपूर भेट या सर्व इतिहासाचे साक्षीदार शहारातील ज्येष्ठ नागरिक आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी एकेका मैदानाला आपले आयुष्य समर्पित करून खेळाडू घडविले. अनेक घटना, अनेक प्रसंग हे आज इतिहास आहेत. हा इतिहास नव्या पिढीला ज्ञात असणे अत्यावश्यक आहे. साहित्य, वक्तृत्व क्षेत्रात अग्रेसर असलेले महापौर म्हणून दयाशंकर तिवारी यांनी यासाठी पुढाकार घेऊन या इतिहासाचा पुस्तकरुपी ठेवा पुढील पिढीकडे सोपवावा, अशीही अपेक्षा ना.नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागपूर महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारे पुस्तक तयार करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे संचालन शुभांगी बोहरे यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर यांनी मानले.
स्वातंत्र्य सेनानींचा गौरव
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले. सत्यभामा गोसेवाडे, लिलाबाई चितळे, अंजनाबाई निमजे, बसंत कुमार चौरसिया, महादेव कामडी, प्रभा अहिरकर, सखुबाई अतकूरवार, यमुनाबाई डोर्लीकर, कलावती खिरेकर, बानूबाई आदमकर, शांताबाई पिंपळकर, चारुमती सोनी, विमल खोरगडे या स्वातंत्र्य सेनानींचा ना. नितीन गडकरी यांनी सत्कार केला.
आधीच्या विपरीत परिस्थितीत कुटुंब आणि सामाजिक विरोध झुगारून प्रेम विवाह करणारे डॉ. ढवळे दाम्पत्य आणि रामटेके दाम्पत्य यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानित
मेजर हेमंत जकाते, मेजर प्रभाकर पुराणिक, वॉरंट ऑफिसर टिकाराम, नाथक एल. एम. बशीशंकर, साजेंट मनोहर वातकूलकर, जंगलिया दुफारे, लक्ष्मण पी. लोखंडे, डॉ. मधुपजी पांडे, सर्जेराव गलपट, दिवाकर ढवळे, कमलाकर धारव, अरविंद खांडेकर, तुकारामजी भोतमांगे, रामरतन सारडा, चंद्रकांत भाई ठक्कर, प्रकाश एदलाबादकर, हरिदास टेंभुर्णे, भंते सुसाईजी दिक्षाभूमी, डॉ. क्षिरसागर गुरुजी, वसंतराव शॉ, योगानंद काळे, प्राचार्य पांडे सर, रामभाऊ खांडवे, शिवाजीराव माहिते, डॉ . राजेन्द्र पटोलीया, डॉ. भागचंद्र जैन, डॉ बल्लाड, शंकर वानखडे, डॉ. दिवाकर भोयर, विलास प्राप्तिकर, सुधीर तुपकर, विठ्ठलराव जिभकाटे, मनोहरराव खर्चे, वसंत पाटील, सुरेश रेवतकर, वासुदेव वाकोडीकर, मनोहर तुपकरी, प्रमीला राऊत, गंगाधर नागपुरे, मधुकर पाठक, श्रीराम बांधे, वसंत भगत, नागेश दंडे, हुकुमचंद मिश्रीकीटकर, विकास बोरगावकर, नरेश धोपटे, शिवनाथ बंसोड, देवेंद्र अहिरकर, विठ्ठल भेदे, नारायण चांदुरकर, वसंतराव इंगोळे, सुजाता लोखंडे, सुधाकर गोशेट्टीवार, टिकाराम रामटेके, बाबुजी बांगडे, बोधीसत्व रूपाताई कुलकर्णी , कुंदाताई विजयकर, दत्ताजी चिवाने, एन. एल. डोंगरे, गोविंदलाल अग्रवाल, गोविंदलाल आठवले, प्रभाकरराव ठेंगळी, महेश रायपूरकर, शोभना मोहरील, अजित दिवाळकर, मृणाल पुराणिक, रामचंद्र बावनकर, रमेश काळबांडे आदी मान्यवरांचा ना. नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.