नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी आपली परंपरा कायम राखत २०१९ ची जलकुंभ स्वच्छता मोहिम सुरु केली असून डिसेंबर ११ , २०१९ ला खामला (पांडे-ले-आउट) जलकुंभाच्या स्वच्छते चे काम करण्याचे ठरविले आहे.
या दरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: पांडे ले आउट, स्नेह नगर, मालवीय नगर, तपोवन, जय प्रकाश नगर, सेन्ट्रल Excise कोलोनी, छत्रपती नगर, डॉक्टर कॉलोनी, पंचदीप नगर, मेहेर बाबा कॉलोनी, पावन भूमी, सावित्री विहार, पर्यावरण नगर, कास्मो पोलीटन सोसयटी, उज्ज्वल नगर , कुर्वे नगर, राजीव नगर-वर्धा रोड, , राहुल नगर, सोमलवाडा, पायोनियर सोसायटी, इंजिनियर सोसायटी, बनते ले आउट आणि सीता नगर .
मनपा-OCW यांनी बाधित भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यादरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.