Published On : Sat, Nov 3rd, 2018

खामला ,तरोडी आणि वडोदा वीज उपकेंद्रांचे ५ ला लोकार्पण

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र राज्य विदुयत वितरण कंपनीतर्फे १८. ५१ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच शहरातील खामला येथील ३३/११ कि. व्हो. उपकेंद्रांचे लोकार्पण ५ नोव्हेंबर २०१८ रोजी ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे.

कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा येथील ३३/११ कि. व्हो. उपकेंद्रांसाठी केंद्र सरकारच्या दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेत तर काँग्रेसनगर विभागातील खामला येथील वीज उपकेंद्रासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत निधी मिळाला.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खामला वीज उपकेंद्राच्या उभारणीवर १२ कोटी ७२ लाख रुपये खर्च झाले असून यातून टेलीकॉमनगर, दीनदयाल नगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालास शाळा, भेंडे ले आऊट, खामला, पांडे ले आऊट, चिंच भवन येथील वीज ग्राहकांना यापुढे योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे. या वीज उपकेंद्रातून एकूण ९ वाहिन्या काढण्यात आल्या आहेत.

तरोडी येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीवर २ कोटी ३८ लाख रुपये खर्च झाला असून उपकेंद्र सुरु झाल्यावर २ हजार घरगुती,६०० कृषी आणि १२ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे. वडोदा येथील वीज उपकेंद्राच्या उभारणीवर ३ कोटी ४१ कोटी रुपये खर्च झाला आहे. यातून एकूण ८ फीडर काढण्यात आले आहेत.

सदर उपकेंद्र सुरु झाल्यावर १७०० घरगुती, ९०० कृषी आणि १४ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे. या सोबतच जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात जीआयएस तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आलेल्या उपकेंद्राचे आणि नव्यानेच स्थानांतरित झालेल्या उमरेड विभागीय कार्यालयाचे उदघाटन दुपारी होणार आहे.अशी माहिती महावितरण नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दिली आहे.

Advertisement