Published On : Wed, Sep 9th, 2020

खरबी जलकुंभ स्वच्छता १० सप्टेंबरला

Advertisement

शटडाऊन दरम्यान टँकर पुरवठादेखील राहणार बंद

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी खरबी जलकुंभाची स्वच्छता गुरुवार १० सप्टेंबर २०२० रोजी करण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यादरम्यान खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. तसेच खरबी जलकुंभांवरून टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही.

येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन करणाऱ्या OCWने जलकुंभ स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. यासाठी स्व-विकसित प्रणालीचा वापर करून मनपा-OCW दरवर्षी शहरातील सर्व जलकुंभ स्वच्छ करीत असतात. जेणेकरून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करता यावा.

गुरुवार १० सप्टेंबर रोजी खरबी जलकुंभ क्षेत्रातील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: ऑरेंज नगर, लता मंगेशकर नगर, चैतन्येश्वर नगर, अनमोल नगर, गजानन नगर, तेजस्विनी नगर, राधाकृष्ण नगर, शारदा नगर, लोककल्याण नगर, गिद्दोबा नगर, साईबाबा नगर, वाठोडा, शक्तीमाता नगर, शिवणकर स्लम

नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

Advertisement