Published On : Tue, Nov 21st, 2023

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची तयारी अंत‍िम टप्‍प्‍यात

Advertisement

कार्यक्रम स्‍थळी मिळणार त्‍या दिवशीच्‍या कार्यक्रमाच्‍या पासेस
-ऑनलाईन पासेस राहतील अहस्‍तांतरणीय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून आकाराला आलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे 24 नोव्‍हेंबर ते 5 डिसेंबर दरम्‍यान आयोजन करण्‍यात आले असून त्‍याची तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. 20 हजार चौ.फूट आकाराचा भव्‍य मंच तयार झाला असून प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्‍हणून यावर्षी एलएडी स्‍क्रीनची संख्‍यादेखील वाढवण्‍यात आली आहे.

Advertisement

ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण, क्रीडा चौक, हनुमान नगर येथे होणा-या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवामध्‍ये यंदा सकाळ व संध्‍याकाळ अशा दोन सत्रात कार्यक्रम होणार आहेत.

सकाळच्‍या सत्रात आध्‍यात्मिक कार्यक्रमाचा जागर केला जाणार असून सायंकाळच्‍या सत्रात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर नामांकित कलाकारांच्‍या मनोरंजनात्‍मक कार्यक्रमाची मेजवानी नागपूरकरांना म‍िळणार आहे. सायंकाळच्‍या कार्यक्रमांच्‍या पासेस कधी मिळणार, याची मोठ्या प्रमाणात विचारणा होत असून नागपूरकरांची उत्‍सूकता शिगेला पोहोचली आहे.

बारा दिवसाच्‍या या महोत्‍सवाचा आनंद घेण्‍यासाठी नि:शुल्‍क पासेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. 91588 80522 वर क्रमांकावर मिस कॉल दिल्‍यास रसिकांना घरबसल्‍या ‘ऑनलाईन’ पासेस प्राप्‍त करता येतील. या पासेस अहस्‍तांतरणीय राहतील याची नोंद घ्‍यावी, असे खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीच्‍यावतीने कळवण्‍यात आले आहे. याशिवाय, कार्यक्रम स्‍थळीदेखील पासेस उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत.

प्रत्‍येक दिवसाच्‍या सायंकाळाच्‍या सत्रातील कार्यक्रमाच्‍या पासेस, त्‍याच दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत कार्यक्रमस्‍थळी सुरू करण्‍यात आलेल्‍या काऊंटरवरून प्राप्‍त करता येतील, असे खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले यांनी म्‍हटले आहे.

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे डिजिटल चॅनेल सुरू करण्‍यात आले असून व्‍हॉट्सअॅपवर उपलब्‍ध असलेल्‍या https://whatsapp.com/channel/0029VaEObkx2UPBAtNMrL21g या चॅनेलला फॉलो केल्‍यास महोत्‍सवाचे सर्व अपडेट्स मोबाईलवर प्राप्‍त करता येतील.

महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी सम‍ितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर प्रयत्‍नरत आहेत.
……..
खासदार सांस्कृतिक महोत्सव – 2023 चे वेळापत्रक
शुक्रवार, 24 नोव्‍हेंबर
सायं. 6.30 वाजता : स्‍वामीनारायण मंदिराचे डॉ. पूज्‍य ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांच्‍या हस्‍ते उद्घाटन व संस्कार भारती प्रस्तुत महाराष्‍ट्राची संस्‍कृती दर्शवणारा 900 कलाकारांचा सहभाग नाट्य, नृत्‍य व संगीतमय कार्यक्रम ‘महाराष्ट्र माझा’
शनिवार, 25 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री हनुमान चालिसा पठण
सायं. 6.30 वाजता : हरहुन्‍नरी गायिका श्रेया घोषाल यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
रविवार, 26 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : भव्‍य परित्‍तदेशना (परित्राण पाठ)
सायं. 6.30 वाजता : भोजपुरी सुपरस्‍टार अक्षरा सिंग यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
सोमवार, 27 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री रुद्र पठण
सायं. 6.30 वाजता : संत तुकडोजी महाराजांच्या जीवनावर आधारीत महानाट्य ‘क्रांतीनायक’
मंगळवार, 28 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्रीसुक्त पठण
सायं. 6.30 वाजता : ‘अॅन इव्हिनिंग विथ सुलतान ऑफ म्‍युझिक’ अदनान सामी यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
बुधवार, 29 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री हरिपाठ पठण
सायं. 6.30 वाजता : संत गजानन महाराज यांच्यावरील महानाट्य ‘गण गणात बोते’
गुरुवार, 30 नोव्हेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण
सायं. 6.30 वाजता : गोल्‍डन ग्‍लोब अवॉर्ड प्राप्‍त ‘लेट्स नाचो’ फेम बेनी दयाल यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
शुक्रवार, 1 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री विष्णूसहस्त्रनाम पठण व गीता अध्याय12/15 पठण
सायं. 6.30 वाजता : ‘गँग ऑफ वासेपूर’ फेम गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेते पीयूष मिश्रा यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
शनिवार, 2 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्री सुंदरकांड पठण
सायं. 6.30 वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या कार्यावर आधारित ‘संविधान शिल्पकार’ महानाट्य
रविवार, 3 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : श्रीरामरक्षा स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र सामुहिक पठण
सायं. 6.30 वाजता : संगीतकार जोडी सचित-परंपरा यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’
सोमवार, 4 डिसेंबर
सकाळी 6.30 वाजता : मनाचे श्लोक पठण
सायं. 6.30 वाजता : नृत्यस्वरूप गीतरामायण
मंगळवार, 5 डिसेंबर
सायं. 6.30 वाजता : ‘जब वुई मेट’ फेम पॉप सिंगर म‍िका सिंग यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ व समारोप