Published On : Sat, Sep 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वाडी परिसरात खुराणा एक्स्प्रेस खासगी बसची ट्रकला भीषण धडक; जीवितहानी नाही

Advertisement

नागपूर: शहारातील वाडी परीसरात शनिवारी सकाळी खुराणा एक्स्प्रेस खासगी बस ट्रकला धडकल्याने भीषण अपघात घडला.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातप्रवण असलेल्या नागपूर-अमरावती रोडवर हा अपघात झाला असून, सध्या सुरू असलेले बांधकाम आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत.

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन व आपत्कालीन सेवेसह वाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. वाहतूक सुरळीत करून पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

खड्डे आणि वाहतूक पोलिसांची अपुरी तैनाती यामुळे नागपूर-अमरावती रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. वारंवार घटना घडूनही, प्रशासनाने अद्यापही या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महत्त्वपूर्ण कारवाई केलेली नाही.ज्यामुळे शहरातील रस्त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement