नागपूर : नागपूरच्या पांचगाव येथील भाजप पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. राजू डेंगरे यांचा मृतदेह विहिरगाव परिसरामध्ये आढळून आला. मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
मृतदेह हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली. राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवणुकीतले विजयी उमेदवार होते. त्यांच्या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. कुही पोलीस पुढील तपास करत आहेत.
भाजप पदाधिकारी राजू डोंगरे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे. राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कुही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.