Advertisement
नागपूर: हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नरसाळा परिसरातील एका किराणा दुकानदाराची हत्या करण्यात आली. गणेश पानकवसे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे स्वतःचे किराणा दुकान आहे.
या हत्येप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी पंकज टोंग याला ताब्यात घेतले.
माहितीनूसार, मृतक गणेश पानकवसे याचे किराणा दुकान होते. किराणा दुकानात किराणा घेण्याच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कारण हत्याकांडाच्या दिवशी पंकज किराणा दुकानात सामान घेण्यासाठी आला होता.
हुडकेश्वर पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.