Advertisement
नागपूर : शहरात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.नुकतीच बजाज नगर पोलीस ठाण्यांतर्गत विवेकानंद स्मारकाजवळ काल २१ वर्षीय तरुणाने आपल्याच वडिलांची हत्या केली.
हे प्रकरण ताजे असताना कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत धर्म नगर येथे किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.प्रेम धनेश निशाद (वय 21, रा विजयनगर) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तर भूपेंद्र बघमरिया (वय 18 वर्ष रा धर्म नगर ) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटनाा मध्यरात्री घडली, या घटनेनंतर जखमी युवक प्रेम धनेश निशादला नागपुरातील मेयो शासकीय रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी लगेच आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे.