रामटेक: आजारी नातरवाईकांना दवाखान्यात नेल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू असताना अनेकदा रुगणांची घरची मंडळी किंवा नातेवाईक भीतीपोटी अशांत होऊन हिंसक कृतींना वळण देतात .असाच प्रकार रामटेक येथील किमया हॉस्पिटल ,शितलवाडी रामटेक येथे घडला.
किमया हॉस्पिटलमध्ये वीरेंद्र अशोक लोखंडे व अशोक लोखंडे यांचे नातेवाईक प्रकृती ठीक नसल्याने ऍडमिट होते. दोन ते तीन दिवस महिला रुग्णावर उपचार सुरू होता . आणि रुगणाची प्रकृती दुरुस्त होत होती. परंतु वीरेंद्र लोखंडे यांनी पेशंटला दवाखान्यात ऍडमिट केल्यापासूनच अतिशय असभ्य पद्धतीने स्टाफमधील नर्स व कर्मचाऱ्यांशी वागत होता. त्यावेळी मॅनेजर योगेश चकोले यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच्यावरच हात उचलला व शिवीगाळ केली सोबतच फार्मासितील सुमित उज्जर व कॅन्टीनमधील अविनाश कारेमोरे सोडविण्यासाठी धावून आले असतांना अशोक लोखंडे व वीरेंद्र लोखंडे यांनी तिघांनाही मारायला सुरुवात केली.
किमया हॉस्पिटलचे डॉ निनाद पाठक यांनी समजावून सांगूनही दोघेही ऐकायला तयार नसल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले यात अशोक लोखंडे यांना पोलिसांनी अटक केली व वीरेंद्र लोखंडे हा पसार झाला. डॉ निनाद पाठक व् डॉ गौरी पाठक याचा रामटेक नावलौकिक आहे .किमया हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सतत वर्दळ असते. डॉ निनाद पाठक हे बालरोग तज्ञ असल्याने लहान मुले व इतरही रुगणाची फार मोठया प्रमाणावर गर्दी असते. तर डॉ गौरी पाठक ह्या नेत्र रोग तज्ञ आहेत रुग्णाअसाठी त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अतिशय संयत व मित स्वभावी असलेल्या दाम्पत्याने रुग्णसेवेत निरांतरता जोपासली असून अतिशय उपयुक्त सेवा ते रुग्णाना पुरवीत आहे. आणि अशा ठिकाणी रुग्णाच्या नाते वाईकांनी हिंसात्मक भूमिका घेऊन भांडण करणे कितपत योग्य आहे.
वरील हिंसात्मक व लज्जास्पद प्रकारामुळे रामटेक येथील डॉक्टरांनी वरील घटनेची निंदा केली असून आशा घटना घडू नयेत म्हणून आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी सहायक पोलीस अधीक्षक लोहित मतानी, तहसीलदार धर्मेश पुसाटे यांना निवेदन दिले. यावेळी डॉ निनाद पाठक, डॉ गौरी पाठक, डॉ अंशुजा किंमतकर, डॉ योगेश राहाटे, डॉ भुमेश्वर नाटकर, डॉ कुरेशी, डॉ पावडे, डॉ मालाधारी, डॉ मयूर डाखोरे, डॉ प्रवीण चामत, डॉ ओंकार चौधरी यांनी निवेदन दिले.
सदर घटनेची पोलिसात तक्रार दाखल झालेली असून रामटेक पोलिसांनी एकास अटक केली व एक जण फरार झाला आहे.पोलिस निरीक्षक वंजारी यांनी फिर्यादीचे रिपार्ट वरून पो. स्टे. रामटेक येथे क्र.347/,18 कलम294,504,323,34 भादवी कलम3/4 महा वैद्यकीय सेवा अधिनियम आणि वैद्य संस्था (हिंसक कृत्य किंवा नुकसान प्रतिबंधक कायदा) कलमानव्ये गुन्हा नोंद केली असल्याचे पोलीस निरीक्षक दीपक वंजारी यांनी सांगितले.