नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल न करता उलट त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणारे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी
कोराडी येथे नाना पटोले यांना अटक करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले होते.
या आंदोलनानंतर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करीत त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. परंतु या गंभीर तक्रारीची दखल घेण्याऐवजी पोलिसांनी चक्क बावनकुळे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
कोवीड मार्गदर्शन सुचनांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून बावनकुळे यांच्यावर कोराडी पोलिस ठाण्यात कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या या संतापजनक कारवाईमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.