नागपुर : पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान महाराष्ट्र सरकारने ४० लाख नवीन शिधावाटप पत्रिका तर ३० लाख गॅस कनेक्शन देण्याच्या कार्यक्रमाला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असुन यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील अतिदुर्गम कारेगाव बंडल व अर्ली येथे ३ सप्टेंबर रोजी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मशीनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी विषेय जनता दरबार आयोजित केला आहे तरी सर्व वंचितांनी “मागेल त्याला अन्न व गॅस कनेक्शन ” या योजनेचा घुबडी, चनाखा, दर्यापूर, पिटापुंगरी, खैरी, वडवाड, हिवरी, ठाणेगाव, कोदूरी, सावरगाव, सावंगी, रामनगर, वघारा आदी गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान केळापूरचे तहसीलदार सुरेश केवले यांनी केले आहे .
यावेळी आदिवासी नेते अंकीत नैताम ,बाबुलाल मेश्राम , भीमराव नैताम भाजप नेते नरेन्द्ररेड्डी अर्लीकर ,शिवारेड्डी हिवरीकर ,जिल्हा परीषद सदयस गजानन बेजंकीवार ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगारेड्डी क्यातमवार ,मायाताई बारहाते ,गजानन बोदूरवार ,डॉ दिलीप रेड्डी कुंटावार धनंजय झीलपिलवार ,किशोर रासमवार ,भूमण्णा सरलावार ,जितु मडावी ,वसंतराव कुरवते ,हनमंतु कोवे ,लक्ष्मण कुरवते ,महादेव मामीडवार ,नरसय्या नागुलवार ,रमेश कोपुलवार .गंगाराम तांडेकर व पुनाजी टापरे ,राजेंद्र कोडापे, झिबलाबाई तुमराम , माणिक पेंदोर, श्रीकृष्ण आडे, शंकर अंधारे, अरुण मेश्राम, देविदास कुमरे, कृष्णा शेडमाके, नरसिंग गणाजीवार, रुपेश चिंतलवार, गजानन सातपुते, विजय नैताम राहणार आहे .
यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील अर्ली येथील १०५ कुटुंबाचा २००७ पासुन प्रलंबित असलेला पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न कायम स्वरूपी पट्टे देऊन व त्यावर घरकुल वसाहत निर्माण करून देण्यासाठी गटविकास अधिकारी वानखेडे विषेय प्रस्ताव देणार असल्याची माहीती अर्ली येथील सरपंच पूजा कोवे यांनी यावेळी दिली
मागील अनेक वर्षांपासून अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील वसाहत सम्पूर्ण निकामी झाली असुन प्रचंड प्रमाणात दुरुस्तीचे काम आहे ,किशोर तिवारी यांच्या पाठपुराव्याने दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून या कामाची पाहणी यावेळी करणार माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी यांनी दिली .
मागील २२ वर्षापासुन बंद झालेली कारेगाव बंडल येथील आश्रमशाळा अवख्या २२ दिवसात सुरु करण्याचा निर्णय आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी घेतला असुन तसे आदेश त्यांनी प्रकल्प अधिकारी आत्माराम डबे यांना दिले असून कारेगाव बंडल येथील आश्रमशाळा सेमी इंग्लिश असुन या ठिकाणी आय टी आय सुद्धा सुरु करणार असल्यामुळे आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय आता कमी होणार आहे या शाळेची पाहणी सुद्धा किशोर तिवारी यावेळी करणार आहेत.