नागपूर: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रभाग – 37 दक्षिण – पश्चिम तर्फे आज 2500 लोकांसाठी ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आले. नागपूर शहराचे प्रथम नागरिक महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते किचनचे उद्घाटन करण्यात आले.
या किचनचे कोअर टीममधील सदस्य नगरसेवक दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, विमलकुमार श्रीवास्तव, विवेक मेंढी, नितीन महाजन यांनी ह्या सेवाकार्यासाठी पुढाकार घेतला आहे.
या कार्यक्रमात माजी महापौर नंदा जिचकार, विजय राऊत, गिरीश देशमुख , गोपाल बेहरे, शंतनू येरपुडे, प्रदीप चौधरी, बंडू गायकवाड, उदय अंबुलकर, जीवन मुदलियार , मंगेश पातूरकर, स्नेहा अडेकर, रवींद्र बोकारे, विनय आंबूलकर, अनुसया गुप्ता, शिल्पा पथे, रेणुका काशीकर, वर्षा चौधरी, शरद जिचकार, रवी कुळकर्णी, संदीप गभणे, सुनील गोले, नाथाभाई पटेल, बबनराव दियेवार, धनंजय डोरले, मेघा पंडित, सुनीत सोनडवले, साहेबराव मनोहरे, चैतन्य दवंडे, राजेंद्र अग्रवाल, रोहित श्रीवास्तव, अंकित दास, प्रमोद जोशी, प्रशांत बोकारे, अनुप वर्मा, स्नेहा अडेकर, रजल कडेल, अनिकेत सोनडवले उपस्थित होते.