कळमना फाट्यावरील टी पॉईंट वर चंदू चे चहा चे दुकान आहे, याच दुकानात आज दिनांक 26 एप्रिल 2022 ला अंदाजे चार साडेचारच्या दरम्यान युवराज बाबुराव नौकरकर हा युवक हातात चाकू घेऊन चंदू च्या अंगावर धावून आला व काही कळायच्या आतच चंदू पांडुरंग सावरकर या युवकाच्या पोटात स्वतः जवळील चाकूने सपासप वार करीत त्याला लोळविले,
एक वर्ष अगोदर युवराज चा एका व्यक्ती सोबत झगडा झाला आणि त्याची मध्यस्थी करायला चंदू पोचला मध्यस्ती झालि, वाद सुटला , परंतु युवराज च्या मनात काही वेगळेच होते, आज दुपारी चार साडेचारच्या दरम्यान युवराज ने चंदू वर हल्ला केला, चंदूच्या पानठेल्यावर बसलेले सर्व लोक चंदू वर हल्ला झाल्याबरोबर सैरावैरा पळून गेले.
नंतर काही लोकांनी चंदूला उचलले व प्राथमिक आरोग्य केंद्र बेला येथे भरती केले परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने चंदू ला नागपूर मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.
युवराज ने चंदू वर चाकू हल्ला केल्यानंतर स्वतःच्या हाताला सुद्धा त्याने चाकूने कापून घेतले , व रक्तबंबाळ अवस्थेत तो बेला पोलीस स्टेशन मध्ये पोचला, त्याने फिर्याद दिली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लागलीच कारवाईला सुरुवात केली, चंदू ला पाच वर्षाचा मुलगा असून आई वडील असे त्याचे कुटुंब चहाच्या टपरी च्या भरोशावर आपला उदरनिर्वाह करीत असतात.
या प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रशांत भोयर, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार अजय चौधरी, हे करीत असून धारा 307 अ,504,भा द वी 4/25 हत्यार बाळगणे , या अंतर्गत युवराज बाबुराव नौकरकर याला अटक करण्यात आली