Published On : Sat, Apr 2nd, 2022
By Nagpur Today Nagpur News

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सव प्रारंभ

नागपूर : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सव प्रारंभ झाला. पहाटे ५ वाजता देवीचा अभिषेक व शृंगार आरती संपन्न झाली. तर सकाळी ११ वाजता संस्थानाचे अध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते घट स्थापन करण्यात आला. यावेळी श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे उपस्थित होते.

यंदा कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, अत्यंत भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सव संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. आज सायंकाळी 4 वाजता गणेेशपूजन, पुण्याहवाचन, कलशपूजन, कुलदेवी षोडसमांत्रिका पूजन, मंडल पूजन करण्यात आले. संध्याकाळी भजन आरतीनंतर भक्तीमय जसचे आयोजन करण्यात आले.

Gold Rate
Tuesday 18 Feb. 2025
Gold 24 KT 85,800 /-
Gold 22 KT 79,800 /-
Silver / Kg 96,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचे उपाध्यक्ष नंदुकिशोर बजाज, सचिव दत्तु समरितकर, सहसचिव प्रभा जयपालजी निमोने, कोषाध्यक्ष सुशिला रमेश मंत्री यांच्यासह अॅड. मुकेश शर्मा, अजय विजयवर्गी, केशव फुलझेले महाराज, बाबूरावजी भोयर, अॅड. गंगाधर चन्ने, प्रेमलाल पटेल, अशोकबाबू खानोरकर, डॉ. नंदिनी त्रिपाठी, स्वामी श्री. निर्मलानंद मगलानंदजी महाराज, लक्ष्मीकांत तडसकर हे विश्वस्त तसेच कोराडी ग्राम पंचायत सरपंच नरेंद्र धानोले, उपसरपंच आशिष राऊत व ग्राम पंचायत सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement