नागपूर: श्री महालक्ष्मी जदगंबा संस्थान कोराडी येथे दरवर्षी चैत्र आणि अश्विन नवरात्रोत्सवात अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येते. यावर्षीपासून कोराडी महालक्ष्मी मंदिरात भक्तांसाठी वर्षभर अखंड ज्योत प्रज्वलित करण्याची सुविधा उपल÷ब्ध करून देण्यात येत आहे. अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलनाच्या नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे.
या सोयीमुळे भक्तांना आपल्या किंवा आपल्या परिचितांच्या नावे वर्षभर अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करता येईल. एक वर्ष ज्योत प्रज्वलित करण्यासाठी 2100 रुपये एवढी सहयोग राशी भक्तांना जमा करावी लागेल. अखंड मनोकामना ज्योत एक वर्षासाठी प्रज्वलित करणार्या भक्तांना देवस्थानच्या व्यवस्थापनातर्फे 5 व्हीआयपी प्रवेशिका नि:शुल्क देण्यात येतील. त्यामुळे जदगंबेचे दर्शन घेणे सोयीचे होईल.
सध्या कोराडी मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कार्ये आणि जीर्णोध्दार सुरु आहे. मंदिर व्यवस्थापनाने आपले सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन निराधार वृध्दांसाठी एक सर्व सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि पुरुषांसाठ़ी स्वतंत्रपणे निर्माण होणार्या वृध्दाश्रमात एकूण 70 वृध्दांची व्यवस्था होईल. तसेच मंदिर परिसरात दिव्यांगांसाठी अपंग पुनर्वसन निर्माण केंद्राचे निर्माण केले जात आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्गांग स्त्री पुरुषांना शारीरिक व्याधीवरील उपचारासहीत त्यांच्यासाठी विविध योजनांवर काम केले जाईल.
भुकेल्याला पोटभर अन्न ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा म्हणून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने दररोज 500 लोकांना अत्यंत कमी किमतीत पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याच निर्णय घेतला आहे. समाजातील अनाथ मुलांना आधार मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने सर्व सुविधायुक्त अनाथालयाचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या भक्तांना अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्याची इच्छा असेल तसेच मंदिर विकास कर्यालयात आपले अमूल्य योगदान देण्याची इच्छा आहे, त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क- गणेश- 9607979222, आकाश-8956641122.