Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
कार चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला.
माहितीनुसार, आज मंगळवार पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तीव्र गतीने येणारी एक स्विफ्ट कार रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या रेलिंगला धडकली आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन कार पलटी घेऊन अनेक मीटर लांब जाऊन पलटली.अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघे गंभीर जखमी आहेत.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.