Published On : Mon, Mar 26th, 2018

धर्मपाल मेश्राम चिकाटी असलेले कार्यकर्ते

Advertisement


नागपूर: जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेत काम करायचे असेल तर अंगी चिकाटी लागते. ही चिकाटी ज्यांच्या अंगी असते तो महापालिकेच्या माध्यमातून जनतेची योग्य सेवा करू शकतो. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या अंगी चिकाटी आहे. विधी समितीचा कार्यभार ते यशस्वीपणे पार पडतील. समितीच्या कार्याला न्याय देतील, असा विश्वास आ. कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या विधी समितीच्या सभापतीपदी अविरोध निवड झाल्यानंतर नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सोमवारी (ता. २६) पदभार स्वीकारला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून आ. खोपडे बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर आणि शहर संघटन मंत्री भोजराज डुंबे उपस्थित होते. सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, विधी समितीच्या नवनिर्वाचित उपसभापती संगीता गिऱ्हे, समिती सदस्य जयश्री वाडीभस्मे, विधी समिती सदस्य अमर बागडे, समिता चकोले, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, विधी समितीच्या मावळत्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका भारती बुंदे, विधी अधिकारी व्यंकटेश कपले उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले, महापालिकेत पहिल्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. अनेक लोकं लहान पदावर असतानादेखिल त्यांच्या कार्याने ते मोठे झाले. आपण कसे काम करतो, यावर आपले मोठेपण ठरत असते. ॲड. धर्मपाल मेश्राम हे युवा कार्यकर्ते आहे. काम करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. ते आपल्या कार्याने समितीला एक वेगळी ओळख देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, विधी समितीचे कार्य सभापती म्हणून सांभाळणे हे एक मोठे आव्हान आहे. या समितीसाठी स्वतंत्र ५० लाख रुपयांची तरतूद व्हायला हवी, जेणेकरून मनपाच्या विरोधात न्यायालयात असलेली अनेक प्रकरणे मार्गी लावणे सोपे जाईल.

याप्रसंगी बोलताना ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले, आपण नगरसेवक म्हणून नव्याने निवडून आलो. अवघ्या एक वर्षातच पक्षाने आपल्यावर विधी समितीचे सभापती म्हणून जबाबदारी टाकली. कुठेतरी आपल्या कार्याची दखल घेतली गेली, याचा आनंद आहे. पक्षश्रेष्ठींचा विश्वास आपण आपल्या कार्यातून सार्थ ठरवू, असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी सर्व मान्यवरांनी ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन आनंद आंबेकर यांनी केले.

Advertisement