नागपूर विमानतळ येथे जंगी स्वागत
कार व बाईक रैलीतून नागपूरने अनुभवला युवकांचा जल्लोष
नागपूर, दि. २० मार्च : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ५ लाखांहून अधिक मते घेऊन निवडून आलेले कुणाल राऊत यांच्या प्रथम आगमणानिमित्त भव्य स्वागत रॅलीने आज नागपूर शहर दुमदुमले. आज दुपारी ४ वाजता त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन झाल्यानंतर भव्य स्वागत करण्यात आले. आणि त्यांची विजयी स्वागत रॅली युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या विविध फ्रंटलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करित विमानतळ ते सविधान चौक पर्यंत कार व बाईक रॅली सह काढण्यात आली.
सर्वप्रथम रॅली विमानतळावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आली. यावेळी कुणाल दादा राऊत यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
या विजयी रॅलीच्या दरम्यान अजणी चौक येथील माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण तसेच व्हरायटी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कुणाल दादा राऊत यांनी अभिवादन केले.
कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड जाहीर होताच युवक काँग्रेसमध्ये राज्यभरात आणि नागपुरात आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय., नागपूर शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, सेवादल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र, संकल्प सेवाभावी सामाजिक संस्था व इतर संघटनेतील पदाधिकारी व कायर्कत्याकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
विमानतळ येथून ही स्वागत रैली हॉटेल प्राईड समोरुन – छत्रपती चौक – अजनी चौक – लोकमत चौक – व्हेरायटी चौक या मार्गाने स्वागत रैली संविधान चौक येथे पोहचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कुणालदादा राऊत यांनी अभिवादन केले. नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर जयपुरकर यांनी केलेल्या आवाहनानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे युवक काँग्रेस व विविध फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान चौक येथे स्वागत रैलीचे समापण प्रसंगी कुणाल राऊत यांनी मान्यवरांचा उपस्थितीत सभेला संबोधित केले.
यावेळी माजी आमदार अशोक धवड,तानाजी वनवे, संजय दुबे, रोशन बिट्टू, के.के.पांडे, अनिल नगरारे,नरेंद्र जिचकार, प्रफुल्ल गुडधे पाटील, बंटी शेळके,तौसिफ शेख, रत्नाकर जयपूरकर, राजेश लाडे, सुरेश पाटील, मूलचंद मेहेर, दीपक खोब्रागडे, विजयाताई हजारे, सेवादलचे प्रवीण आगरे, याज्ञवल्क्य जिचकार, इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात युवक युवती सहभागी झाले होते.