Advertisement
नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडावा म्हणून कुणबी आणि ओबीसी समाजातर्फे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे.
पोळा सणाच्या निमित्ताने बैल जोडीचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. कुणबी – ओबीसी समाजाकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाला कुणबी, तेली, माळी, पोवार, मुस्लीम समाजाचा पाठिंबा आहे.
दरम्यान या आंदोलन व उपोषणस्थळी आमदार सुनील केदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी व उपोषणकर्ते उपस्थित आहेत.